पुढील 5 दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता... (पहा व्हिडीओ) Saam Tv
महाराष्ट्र

पुढील 5 दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता... (पहा व्हिडीओ)

काही दिवसांपासून राज्यात हरवलेला पाऊस लवकरच पुन्हा आगमन करणार आहे. येत्या ५ दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शकयता हवामान खात्याने वर्तविला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : काही दिवसांपासून राज्यात हरवलेला पाऊस Monsoon लवकरच पुन्हा आगमन करणार आहे. येत्या ५ दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस Rain पडणार असल्याची शकयता हवामान खात्याने वर्तविला आहे. Heavy rains expected in Maharashtra for next 5 days

राजधानी दिल्लीत Delhi मध्ये २ व ३ जुलैला पाऊस होऊ शकतो. पुढील काही तासांमध्ये सिक्कीम व आसामच्या काही भागात, मेघालय, अरुणाचल प्रदेश व महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या काही भागात सौम्य आणि मध्यम पावसाची शक्यताही वर्तवली आहे.

नैऋत्येडून जोर धरलेल्या वाऱ्यांमुळे पाऊस पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांकडे सरकरण्याची शक्यता आहे. यामुळे १ जुलै पर्यंत संबंधित राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकचा समावेश आहे. पंजाब, राजस्थान, हरियाणा व दिल्लीतही जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाबरोबरच बर्फवृष्टीचा Snowfall अंदाज वर्तविण्यात गेला आहे.

सौम्य ते मध्यम स्वरुपाचा पाऊस उत्तराखंडचा काही भाग, बिहारमधील उत्तर भागातील जिल्हे, पश्चिम बंगाल, विदर्भाचा काही भाग, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप आणि छत्तीसगडचा काही भाग याठिकाणी पडेल. तसेच दक्षिणेकडे झारखंड आणि अंदमान व निकोबार द्वीप समुहात सौम्य आणि काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. असा अंदाज आहे. Heavy rains expected in Maharashtra for next 5 days

मुंबईत Mumbai जून महिन्याच्या सुरुवातीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात ब्रेक घेतलेला दिसून येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावात मिळून केवळ 16 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. परंतु गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा अधिक प्रमाणात आहे. मात्र मुंबईत धरणक्षेत्रात पावसाने अद्याप जोर धरलेला नाही. त्यामुळे अतिशय धिम्या गतीने पाण्याची पातळी वाढत आहे. यामुळे पाणी जपून वापरावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT