वणी शहरात मुसळधार पावसामुळे तुटला सहा गावाचा संपर्क!  संजय राठोड
महाराष्ट्र

वणी शहरात मुसळधार पावसामुळे तुटला सहा गावाचा संपर्क!

वणी शहर पाण्याखाली गेल्याने शहरात पाणीच पाणी साचले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड -

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात (Yavatmal District) मंगळवारी रात्री पासून पावसाने पुन्हा सुरूवात केल्याने अनेक ठिकाणी पुर परिस्थिती पाहायला मिळत आहे. वणी शहर (Wani city) पाण्याखाली गेल्याने शहरात पाणीच पाणी साचले आहे. रात्री जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली त्यानंतर पुन्हा सकाळ पासून पावसाला सुरूवात झाली आहे. शहरा जवळून वाहणाऱ्या निर्गुडा नदी दुथडी भरून वाहत असून शहरातील मुकूटबन रोड, नांदेपेरा मार्ग, गुंजेचा मारोती मंदीर आदी परिसरात पाणी शिरले आहे. मात्र अद्याप कोणत्याही धरणातून पाणी सोडण्यात आलेलं नाही, बेंबळा किंवा नवरगाव प्रकल्पातून पाणी सोडल्यास प्रचंड नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Heavy rains cut off communication between six villages in Wani)

हे देखील पहा -

वणी तालुक्यातील कायर, पठारपूर, रांगणा, भुरकी, चारगाव, वारगाव या गावात जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्याला पूर आल्याने वाहतूक बंद होऊन संपर्क तुटला आहे. वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे हे शहरातील विविध भागात जाऊन पुर परिस्थितीची पाहणी करित आहे. नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विदर्भ नदी देखील दुथडी भरून वाहत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची भावनेला हात घालणारी प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT