IMD Unseasonal Rain Alert Saam TV
महाराष्ट्र

Weather Alert : राज्यात आज पुन्हा अतिमुसळधार पाऊस; IMD कडून 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट

Maharashtra Weather Update 16 June 2024 : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे, पालघर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Satish Daud

मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. कोकणात मुसळधार पावसाने कहर केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात विक्रमी पाऊस झालाय. त्यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी अनेक शहरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटलाय. अशातच आज पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात आज काही ठिकाणी मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट (Rain Alert) देण्यात आला आहे. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे, पालघर जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तर सांगली आणि सोलापूर वगळता उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. नागरिकांनी काळजी घ्यावी, अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज मंगळवारी किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी मुसळधार (Heavy Rain) आणि राज्याच्या उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. किनारपट्टीवरील उर्वरित जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, राज्याच्या अन्य भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे राज्यातील काही शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं प्रशासनाने म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT