Flood crisis in Solapur: 29 villages submerged, schools shut due to heavy rainfall. saam Tv
महाराष्ट्र

Solapur Flood: सोलापूर महापूर! २९ गावं पुराच्या पाण्यात; ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर

Solapur District School Closed: सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील २९ गावे पुराच्या पाण्याखाली गेली आहेत.

Bharat Jadhav, विश्वभूषण लिमये

  • सोलापूर जिल्ह्यातील २९ गावं पुराच्या पाण्याने वेढली.

  • मुसळधार पावसामुळे सीना व भोगावती नदीला पूर आला.

  • ग्रामीण भागातील शाळांना सुरक्षिततेसाठी सुट्टी जाहीर.

सोलापूर जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांनी पूर आलाय. महापुरामुळे जिल्ह्यातील भयान परिस्थिती निर्माण झालीय. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील नद्यांना पूर आलाय. त्यामुळे जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी देण्यात आलीय. अहिल्यानगर व धाराशिव जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना कोळेगाव, चांदणी, खासापुरी प्रकल्प तसेच भोगावती नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय.

परिणामी सीना नदीकाठावरील गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पुराचा धोका निर्माण झालाय. जिल्ह्यातील २९ गावांना पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय. जिल्हाभरात पुराची स्थिती पाहता ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. आधी जिल्ह्यातील शाळांना एक दिवसाची सुट्टी देण्यात आली होती, त्यानंतर आता परत एकादा सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

जिल्ह्यातील उत्तर सोलापूर ग्रामीण, माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील नगरपरिषद, जिल्हा परिषद शाळांना सुट्टी देण्यात आलीय. जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्यानं जिल्हा प्रशासनाने शाळांना देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. भारतीय हवामान खात्याने सोलापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलाय.

उत्तर सोलापूर (ग्रामीण), माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी व मंद्रुप (दक्षिण सोलापूर) तालुक्यांमध्ये पूरस्थितीची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी तातडीने शोध व बचाव कार्यासाठी पथकांची नियुक्ती केलीय.

दरम्यान जिल्ह्यातील शिंगेवाडी, पिठापूर, वाघेगव्हाण, मुंगशी, लव्हे, तांदुळवाडी, दारफळ, राहुल नगर, सुलतानपूर, केवड, वाकाव, खैराव, कुंभेज, आवारपिंपरी, कपिलापुरी, बोपळे, पासलेवाडी, एकरूखे, मलिकपेठ, खरकटने, कोळेगांव, आष्टे, घाटणे, शिरापूर, पिरटाकळी, शिंगोली, तरटगांव, शिवणी, अकोले, विरवटे या गावांना पुराच्या पाण्याने विळखा घातलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT