sangli, rain, Almati dam saam tv
महाराष्ट्र

Sangli : सांगलीत पावसाचा जाेर कायम; एक पूल, तेरा बंधारे गेले पाण्याखाली

राज्यभरात पडत असलेल्या पावसामुळं बहुतांश जिल्ह्यातील धरणातून पाणी साेडलं जात आहे.

विजय पाटील

सांगली : राज्यभरात गेल्या चार दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यात देखील दमदार पाऊस झाला आहे. येथील कृष्णा नदीची पाणी पातळी सत्तावीस फुटांवर पाेहचली आहे. याबराेबरच अलमट्टी धरणातून दोन लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने सांगलीस दिलासा मिळाला आहे. दरम्यान पावसामुळं (Rain) जिल्ह्यातील एक पूल आणि तेरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. (Sangli Rain Update)

सांगलीत आयर्विन पुलाच्या जवळ कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. पाणी पातळी वाढल्याने नदी काठावरील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून कोयना आणि वारणा धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.

वारणा धरणातून नऊ हजार चारशे क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी सांगलीच्या वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सततचा पडणार पाऊस यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळी वाढली आहे. या नदीची पाणी पातळी सत्तावीस फुटांवर जाऊन पोहचली आहे.

दुसरीकडे अलमट्टी धरणातून दोन लाख क्यूसेसक पाण्याच्या विसर्ग केला जात असल्याने सांगलीला दिलासा मिळाला आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जिल्ह्यातील एक पूल आणि तेरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर ज्या ठिकाणी बंधाऱ्यावरती पाणी आले आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी बॅरेकट लावलेले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT