Heavy Rain In Nashik Saam Digital
महाराष्ट्र

Heavy Rain In Nashik, Maharashtra: नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, मुंबई, ठाण्यासह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Heavy Rain In Nashik, Maharashtra, Mumbai, Thane IMD Alert : नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागाला अवकाळीचा तडाखा बसला आहे. विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली आहे.

Sandeep Gawade

Heavy Rain In Nashik

नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागाला अवकाळीचा तडाखा बसला आहे. विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली आहे.

पावसामुळे आणि जायकवाडीला पाणी सोडण्यात आल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे नदीकाठावर पार्क करण्यात आलेल्या पर्यटकांच्या वाहनांना पाण्याचा वेढा पडला होता. अनेक वाहने पाण्यात अडकून पडली होती. तर निफाड परिसरात प्रचंड गारपीट झाल्याने कांदा, द्राक्षासह अन्य पिकांना मोठा फटाका बसला आहे.

दरम्यान पुढील तीन तास मुंबई, ठाण्यासह पालघर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बुलढाना आणि या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाशिकच्या निफाड तालुक्यात गारपीट झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. आज सकाळ पासूनच नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू झाला होता. विजांचा कडकडाट आणि गारपीट झाली. यातच नाशिकच्या निफाड तालुक्याला देखील या आस्मानी संकटाचा मोठा फटका बसला आहे. द्राक्ष बागांना याचा मोठा फटका बसला असून द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या गारा पडल्याने द्राक्षांचे घड देखील तुटून पडले आहेत. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Tips : थंडीत भांडी धुताना हात गारठणार नाही, वापरा या सोप्या टिप्स

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर

Cholesterol Diet Mistakes: कोलेस्टेरॉल कमी करताय, पण 'ही' एक सामान्य चूक ठरू शकते घातक; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

Beed Politics: मोठी बातमी! बीडमध्ये नवं राजकीय समीकरण, राष्ट्रवादी- शिवसेनेची MIM सोबत युती

Tara Sutaria-Veer Pahariya Breakup: तारा सुतारिया-वीर पहाडिया यांचा ब्रेकअप? गायकाला किस करणं पडलं महागात

SCROLL FOR NEXT