Beed News: कपिलधारच्या विकासासाठी आम्ही निधी आणतो, मात्र इथं बोगस कामे केली जातात; मनोहर धोंडे यांचा आरोप

Beed News: सेवा जन शक्ती पक्षाची स्थापना करण्यात आली असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवार असतील असं शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी सांगितलं.
Beed News
Beed NewsSaam TV
Published On

Beed:

बीडच्या श्रीक्षेत्र कपिलधार येथे वीरशैव लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमा यात्रेत शिवा संघटनेचा भव्य मेळावा संपन्न होत आहे. गेल्या 28 वर्षांपासून मेळावा घेण्याची परंपरा आहे. या ठिकाणी लाखो लिंगायत बांधव सहभागी होतात, मेळाव्यामध्ये राजकीय भूमीका स्पष्ट केली जाणार असल्याचं शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी स्पष्ट केलंय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed News
Beed News : खोटा धनादेश देणं पडले महागात; सराफ व्यापाऱ्याला ६ महिने कारावास, ६ लाख रुपये नुकसान भरपाईची शिक्षा

लोकसंख्येच्या प्रमाणात वीरशैव लिंगायत समाजाला महाराष्ट्रात सत्तेतील वाटा मिळत नसल्याची खंत व्यक्त करत. शिवा संघटना निवडणुकीच्या राजकीय मैदानात उतरणार आहेत. सेवा जन शक्ती पक्षाची स्थापना करण्यात आली असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवार असतील असं शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी सांगितलं.

गेल्या 28 वर्षांपासून आम्ही तीर्थक्षेत्र कपिलधारचा विकास करण्यासाठी प्रयत्न करतोय. 2019 ला 11 कोटी रुपयांचा निधी आला. मात्र इथं जिल्हा प्रशासन, देवस्थान ट्रस्ट आणि गुत्तेदारांकडून बोगस काम केले जातात. अवघा तीन कोटीचा निधी खर्च केलाय, त्याचबरोबर देवस्थान ट्रस्ट देखील हे अधिकृत नाही, असा गंभीर आरोप यावेळी मनोहर धोंडे यांनी केलाय.

दरम्यान राज्यातील पर्यटन केंद्र आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराजांच्या कपिलधारच्या विकास कामाविषयी बऱ्याच योजना आखलेल्या आहेत. माध्यमांशी संवाद साधताना पुढील योजनांची माहिती देण्यात आलीये.

Beed News
Baby Girl Sing Song: जिया धडक धडक..., भन्नाट एक्सप्रेशन्समध्ये चिमुकलीनं गायलं रोमँटीक गाणं; VIDEO एकदा पाहाच

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com