Maharashtra Rain Latest News,  Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस! वीज पडल्याने १४ शेळ्या दगावल्या; शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान

Buldhana Unseasonal Rain News: बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात रात्रीपासून काही भागात विजेच्या कडकडाट सह वादळी पाऊस पडत आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, प्रतिनिधी...

Buldhana Rain News: राज्यभरात सध्या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) कहर पाहायला मिळत आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीमालासह अनेक ठिकाणी जिवीतहानी झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातून अशीच एक दुर्देवी घटना उघडकीस आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात वीज पडून १५ शेळ्या दगावल्या आहेत. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात रात्रीपासून काही भागात विजेच्या कडकडाट सह वादळी पाऊस पडत आहे. आज सकाळी 10 वाजतांच्या सुमारास सिंदखेडराजा तालुक्यातील रताळी गावातिल् भिकाजी सखाराम जाधव हे स्वतःच्या शेळ्या परिसरातील शेतात चारायला गेले होते. मात्र मुसळधार पाऊस व विजेच्या कडकडाट सुरु होता.

याचवेळी शेतातील एका लिंबाच्या झाडावर विज कोसळली. त्याच लिंबाच्या झाडाखाली थांबलेल्या 14 शेळ्या होत्या. त्या सर्व शेळ्या मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे भिकाजी जाधव यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.

ओढ्याच्या पुरात वाहून तरुणाचा मृत्यू....

दरम्यान, काल लातूर (Latur) जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला. या पावसामुळे ओढ्याच्या पुरात एक तरुण वाहून गेल्याची दुर्देवी घटना लातूरच्या देवणी तालुक्यात समोर आली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्देवी घटना घडली होती. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur: धुळ्याच्या लेकीचा स्वॅगच भारी, कोण आहे ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून झोप उडेल

Maharashtra Live News Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला

दुपारी मोबाइल सील, मग रात्री ११.१३ वाजता व्हॉट्सॲपचा लास्ट सीन कसा? फिंगर लॉकद्वारे...; डॉक्टरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा

Suryakumar Yadav: श्रेयस अय्यरची तब्येत कशीये? पत्रकार परिषदेत सूर्यकुमारने दिली महत्त्वाची अपडेट

Box Office Collection: 'थामा' आणि 'एक दीवाने की दीवानियात'मध्ये काटे की टक्कर; बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी?

SCROLL FOR NEXT