IMD Rain Alert Today 8 May 2024  Saam TV
महाराष्ट्र

Rain Alert : विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार, वाचा IMD अंदाज

IMD Rain Alert Maharashtra: शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. येत्या २४ तासांत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Satish Daud

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. येत्या २४ तासांत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज (८ मे) गुरुवार आणि उद्या हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही जिल्ह्यात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठे बदल होत आहे. नागरिकांना कधी उन्हाच्या झळा, तर कधी अवकाळी पावसाचा (Heavy Rain) सामना करावा लागत आहे. तापमानाचा पार चाळीशीपार गेला असताना मराठवाडा आणि विदर्भात अधून मधून अवकाळी पावसाच्या सरी देखील कोसळत आहेत.

या पावसाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. याशिवाय शेतीपिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे विदर्भावर उंच उंच ढग तयार होत आहेत. त्यामुळे ढगातील तापमान शून्य अंशांच्या खाली जाऊन गारांची निर्मिती होत आहे.

परिणामी आज गुरुवार आणि उद्या विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा येथे गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गारपिटीसह विदर्भ, मराठवाड्यात पुढील ४ दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची (Rain Alert) शक्यता आहे.

आजपासून पुढील ४ दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या काळात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. मराठवाड्यापेक्षा विदर्भात पावसाचा जोर अधिक राहू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

SCROLL FOR NEXT