Maharashtra Weather Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather : राज्यात ऊन पावसाचा खेळ, विदर्भाला यलो अलर्ट, वाचा पावसाचा अंदाज

Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रातही जोरदार सरींचा इशारा आहे.

Alisha Khedekar

  • पूर्व विदर्भ व मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता

  • हवामान विभागाचा येलो अलर्ट; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

  • नाशिक-रायगड जिल्ह्यात १०० मिलिमीटर पावसाची नोंद

  • पुढील दोन दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार

राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरु असून पूर्व विदर्भासह मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने या भागांसाठी येलो अलर्ट दिला आहे. राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात अजूनही पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. हवामानातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने आणि अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे वातावरण पावसाला पोषक बनले आहे.

गेल्या २४ तासांत सोमवारी सकाळपर्यंत नाशिक जिल्ह्यातील ओझर खेडा आणि रायगडमधील माणगाव येथे सर्वाधिक १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ज्याच्या इतर भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. ब्रह्मपुरी येथे काल राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा किंचित कमी राहिले.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत गडगडाटासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. याशिवाय मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्याच्या कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. हवामानातील या चढ-उतारामुळे राज्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात ठिकठिकाणी पावसाची तीव्रता कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT