Maharashtra Heatwave Alert Saam Tv
महाराष्ट्र

Heat wave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट जीवावर उठली; अकोल्यात देशातील उच्चांकी तापमान

Heat wave in Maharashtra: राज्यात उष्णतेची लाट पसरलीय. नागरिकांना घरबाहेर प़डणं अवघड झालय. अशातच अकोल्यात देशातील उच्चांकी तापमानामुळे सर्वसामन्यांचे चांगलेच हाल होतायत. उष्णतेची लाट नागरिकांच्या जीवावर कशी उठलीय. पाहूय़ात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Jadhav

रोहित कदम, साम प्रतिनिधी

राज्यात उष्णतेचा पारा चढला असून एप्रिलच्या मध्यावरच कोकणपासून विदर्भापर्यंत तापमानात मोठी वाढ झालीये. पुण्यात 39 अंश तर अकोल्यात यंदाच्या हंगामातील देशातील सर्वाधिक उच्चांकी 43.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. इतकंच नाही तर राज्यात उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उष्णतेची लाट कुठे ?

- अमरावती

- सांगली

- सोलापूर

- छ. संभाजीनगर

- जालना

- परभणी

उत्तर भारतात निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा विपरीत परिणाम म्हणून राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मुंबईत गेल्या दीड महिन्यात उष्माघाताचे 750 रुग्ण नोदवले गेले होते.त्यामुळे राज्यातील प्रशासन अॅक्शन मोडवर आलंय. पारा 40 अंशांच्या पार पोहोचल्यानं पुण्यातही उष्माघाताचा धोका वाढलाय. राज्यातील विविध जिल्ह्यांना हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा दिलाय.

आगामी काळात फळबाग आणि पिकांवर होणारा परिणाम यामुळे राज्यातील शेतकरी धास्तावले आहेत. तसंच, राज्यात विजेची मागणीदेखील वाढण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनान SOP जाहीर केलीय. या उष्णतेच्या तडाख्यातून वाचण्यासाठी आता नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT: RCB नं पाचव्यांदा अंतिम फेरीत मारली धडक; क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा धुव्वा

Fuel Crisis: राज्यात इंधन टंचाईचा भडका, पेट्रोल- डिझेलसाठी हाणामारी

Petrol-Diesel Price Hike: इंधनटंचाईतही दरवाढीचे चटके, गृहखर्चाचं बजेट कोलमडलं; सर्वसामान्य नागरिक चिंतेत

MHT-CET गुणवत्ता यादीत घोटाळा झाल्याचा आरोप; राज्य सीईटी सेलने स्पष्टीकरण देताना काय म्हटलं?

कांदा उत्पादकांचे कष्ट मातीमोल; कांद्याला फक्त सव्वा रुपया भाव, VIDEO

SCROLL FOR NEXT