Maharashtra Heatwave Alert Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Weather: नागरिकांनो काळजी घ्या! विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, इतर ठिकाणी कसं आहे तापमान?

Maharashtra Heatwave Alert: महाराष्ट्रामध्ये तापमान वाढत चालल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आणि दुपारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे.

Priya More

राज्यात तापमानाचा पारा वाढत चालला आहे. विदर्भ आणि कोकणातील तापमान जास्त वाढले आहे. वाढती उष्णता आणि उकाड्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले असून अंगाची अक्षरश: लाही लाही होत आहे. अशातच आता हवामान खात्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झाली आहे. चंद्रपूरमध्ये तापमानाचा पारा ४२ अंशांवर पोहचला आहे. तर अकोला, अमरावती, नागपूर, वर्धामध्ये तापमान ४० अंशाच्या वर पोहचले आहे.

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला आणि नागपूरमध्ये आज उष्णतेची लाट येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी दुपारच्यावेळी घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

अकोला ४१, अमरावती ४०, वर्धा ४१ आणि नागपूरमध्ये ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात पुढील काही दिवस तापमान असेच राहण्याची शक्यता आहे. मुंबईतील वातावरण देखील स्थिर असणार आहे. कोकणातील काही भागात उष्णता आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT