Maharashtra Weather Update 5 May 2024 Saam TV
महाराष्ट्र

Weather Forecast: विदर्भ तापला, मराठवाड्यात उष्णतेच्या झळा; सोमवारपासून पुन्हा कोसळणार पाऊस

Maharashtra Weather Update: मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या झळा बसत आहेत.

Satish Daud

Maharashtra Weather Update 5 May 2024

मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या झळा बसत आहेत. काही ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशीपार गेला आहे. त्यामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. वाढत्या उकाड्यापासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद

यासाठी प्रशासनाने मार्गदर्शक सूचना देखील दिल्या आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार, शनिवारी अकोल्यात सर्वाधिक ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल अमरावती ४३.८, बुलढाणा ४०.०, चंद्रपूर ४३.८, गडचिरोली, वर्धा आणि वाशिम ४३.० आणि नागपूर येथे ४१.५ अंश सेल्सिअस तापमान होते.

मराठवाड्यात उन्हाच्या झळा कायम

मराठवाड्यालाही उन्हाच्या चांगल्याच झळा बसल्या. शनिवारी परभणीत ४३.६, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४१.६, बीडमध्ये ४३.१ अंश तापमान होते. तर मध्य महाराष्ट्रात सोलापूर ४३.४, सांगली ४१.६, सातारा ४०.९, जळगावात ४२.३ आणि मालेगावात ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सोमवारपासून पुन्हा पावसाची शक्यता

दरम्यान, एकीकडे उन्हाच्या झळा बसत असताना दुसरीकडे सोमवारपासून (६ मे) विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

मुंबईत कसं असेल हवामान?

मुंबईतील कमाल तापमानाचा पारा आणखी वाढतच आहे. पहाटे हवेत गारवा जाणवत असला तरी, दुपारनंतर उन्हाचे चटके बसत आहेत. सोमवारीही मुंबईतील वातावरणात उष्णता कायम राहणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, तापमानात वाढ झाल्याने मुंबईसह उपनगरात उष्णतेची लाट येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

SCROLL FOR NEXT