Nanded News Saam Tv
महाराष्ट्र

Heartbreaking : घराजवळ खेळत होते, पाय घसरला अन् कॅनॉलमध्ये पडले, २ चिमुकल्यांचा मृत्यू

Nanded Accident Tragedy news : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील निमगाव येथे दोन वर्षांच्या चिमुकल्या भावंडांचा कॅनॉलमध्ये बुडून मृत्यू झाला. घराबाहेर खेळताना घडलेल्या या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Alisha Khedekar

नांदेडमध्ये दोन वर्षांच्या दोन चिमुकल्यांचा कॅनॉलमध्ये बुडून मृत्यू

दोघेही भावंडं असून एकाच दिवशी मृत्यू

घराबाहेर खेळताना घडली दुर्दैवी दुर्घटना

कुटुंबीय व गावकऱ्यांनी व्यक्त केली तीव्र हळहळ

नांदेडमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. घराबाहेर खेळत असताना जवळच असलेल्या कॅनॉलच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. अवघ्या दोन वर्षांचा मुलगा आणि मुलगी यांना दुर्घटनेत प्राण गमवावे लागले. धक्कदायक म्हणजे ही दोन्ही चिमुकली मुलं भावंडं होती. या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात निमगाव येथे सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. निमगाव येथे राठोड कुटुंबीय वास्तव्यास आहे. त्यांच्या घरापासून वीस फूट अंतरावर कॅनॉल आहे. कॅनॉलमध्ये गुडघाभर पाणी जमा झालं होतं. स्वास्तिक सचिन राठोड (वर्षे २) आणि श्रावणी विठ्ठल चव्हाण (वर्षे २ ) ही दोन चिमुकली मुलं घराबाहेर खेळत होती. तर कुटुंबातील इतर सदस्य घरातील कामामध्ये व्यस्त होते.

खेळता खेळता दोन्ही चिमुकले कॅनॉलजवळ गेले आणि खड्यात पडले. दोन्ही मुले घरात आणि घराबाहेर बराच वेळ दिसत नसल्याने कुटुंबीयांची तारांबळ उडाली. शोधाशोध केल्यानंतर कुटुंबीय कॅनॉलजवळ गेले. या दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह पाणी असलेल्या कॅनॉलच्या खड्ड्यात आढळून आले.

चिमुकल्यांचे मृतदेह पाहताच दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी टाहो फोडला. दोघेही एकाच घरातील मुलं होती. दुर्दैवी गोष्ट म्हणजे दोघांचाही जन्म एकाच दिवशी झाला होता, तर आता मृत्यूनेही त्यांना एकाच दिवशी एकाच घटनेत एकत्र गाठले. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वरीष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले. मात्र या दोन चिमुरड्यांच्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण? हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंना पराभूत करण्यासाठी एक गट सक्रिय, उबाठा फुटणार; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

HSC SSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचे महत्त्वाचे पाऊल! दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच घेतला 'हा' निर्णय

Sanjay Dutt: संजय दत्तने मागितली महिला आयोगासमोर लेखी माफी; 'सरके चुनर' वादानंतर ५० मुलींच्या शिक्षणाचा उचलणार खर्च

Maharashtra News Live Update: खोपोली पेण रस्त्यावर हायवा डंपरला लागली आग

Summer diet tips: उन्हाळ्यात हे पदार्थ खाणं टाळाच, नाहीतर...!

SCROLL FOR NEXT