Satara Latest News Saam TV Marathi
महाराष्ट्र

दुर्दैवी! भारतीय जवानाचा लेकीच्या जन्माआधीच मृत्यू, पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आला होता सुट्टीवर, सातारा शोकसागरात

Indian Army soldier death : साताऱ्यात अपघातात भारतीय सैन्यातील जवान प्रमोद जाधव यांचे दुर्दैवी निधन झाले. पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचा लेकीच्या जन्माआधी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Namdeo Kumbhar

ओंकार कदम, सातारा प्रतिनिधी

Indian soldier dies before daughter birth in Satara : भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या जवानाचे साताऱ्यात अपघातामध्ये निधन झालेय. पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला होता, पण काळाने घाला घातला. साताऱ्यातील दरे गावावर शोककळा पसरली आहे.  प्रमोद परशुराम जाधव असे अपघाती निधन झालेल्या जवानाचे नाव आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लेकीचा जन्म होण्याआधी काही तास  प्रमोद परशुराम जाधव यांचं निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काही तासापूर्वीच जन्मलेल्या बालिकेने घेतले आपल्या पित्याचे अंत्यदर्शन घेतले. हा क्षण प्रत्येकाचे काळीज चिरणारा ठरला.

सिकंदराबाद श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या जवानाचा साताऱ्यामध्ये अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सातारा तालुक्यातील दरे या गावचे प्रमोद परशुराम जाधव असे जवानाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात वडील त्यांची पत्नी आणि नवजात बालक (मुलगी) असा परिवार आहे.

वीर जवान प्रमोद यांना आई नसल्यामुळे पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आठ दिवसापूर्वी सुट्टीवर गावी आले होते. यादरम्यान काही कामानिमित्त वाढे फाटा येथे दुचाकीवर जात असताना पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात जागीच मृत्यू झाला. यामुळे दरे गावासह परळी खोऱ्यात शोककळा पसरली.

आज सकाळी प्रमोद यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. या दरम्यानच त्यांच्या पत्नीने लहान मुलीला जन्म दिला. वीर जवान प्रमोद यांची अंत्ययात्रा अंत्य विधीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर वीर जवान प्रमोद यांची पत्नी आणि लहान बाळाला अंत्यविधीच्या ठिकाणी अंतदर्शनासाठी आणण्यात आले. हा क्षण पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले... आज दुपारच्या सुमारास त्यांच्यावर शासकीय ईतमामात मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ नागपूर शहरातील राजभवन चौकात आंदोलन

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम, लाठीचार्जवरुन घमासान, संसद ठप्प

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT