आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोना निर्बंधांचा विसर; चिमुकल्यांचे लसीकरण विनामस्क संजय डाफ
महाराष्ट्र

आरोग्य अधिकाऱ्यांनाच कोरोना निर्बंधांचा विसर; चिमुकल्यांचे लसीकरण विनामस्क

नागपूरात चिमुकल्यांना न्युमोकोकल लस देताना शेजारी असलेले नागपूर महानगरपालिकेचे अधिकारीच विनामास्क चिमुकल्यांच्या शेजारी वावरत होते. नागपूरात न्युमोकोकल लसीकरणाच्यावेळी हा गंभीर प्रकार घडला आहे.

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

नागपूर - महापालिकेच्या आरोग्य अधिकारी आणि उपयुक्तांना मास्कचं गांभीर्य नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूरात Nagpur चिमुकल्यांना न्युमोकोकल लस Pneumococcal Vaccine देताना शेजारी असलेले नागपूर महानगरपालिकेचे अधिकारीच विनामास्क mask चिमुकल्यांच्या शेजारी वावरत होते. नागपूरात न्युमोकोकल लसीकरणाच्यावेळी हा गंभीर प्रकार घडला आहे.

हे देखील पहा -

कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र म्हणजे मास्क, हे आरोग्य यंत्रणांकडून वारंवार सांगितले गेले आहे. मात्र, खुद्द आरोग्य यंत्रणांचेच अधिकारी या नियमाला तिलांजली देत असेल तर त्याला काय म्हणावं. नागपूरात आजपासून न्युमोकोकल या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. या लसीकरणावेळी खुद्द महापालिकेचे सहआयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांनी मास्क खाली केला होता.

या केंद्रांवर लहान मुलांचे लसीकरण सुरू होते. शिवाय त्यांच्या माता आणि इतर कर्मचारी होते. मुले अगदी दोन चार महिन्यांची असल्याने त्यांना मास्क घालणे शक्य नाही. त्यामुळे त्याठिकाणी उपस्थित असलेल्यांना मास्क घालणे अनिवार्यच होते.

मात्र, आरोग्य अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य कळले नाही आणि त्यांनी आपला मास्क खाली केला होता. यासंदर्भात महापौरांना विचारल्यावर त्यांनी ही या प्रकाराची गंभीर दखल घेतली. जर अधिकारी असं वागत असतील तर ही गंभीर चूक आहे, यासंदर्भात संबंधित अधिकऱ्यांना ताकीद दिली, जाईल असे महापौरांनी स्पष्ट केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: महागड्या फेशियलची काय गरज? घरच्या घरीच 'हा' फेसमास्क लावून मिळवा गुलाबी मुलायम त्वचा

डब्यांवर तेलकट, पिवळे डाग एका मिनिटात होतील गायब! वापरा हे भन्नाट उपाय

Drinking Water Advice: कडक उन्हातून घरी गेल्यावर लगेच घटाघट पाणी पिताय? सावधान! या ४ गोष्टी आताच टाळा, अन्यथा...

Aishwarya Rai: ऐश्वर्या राय कान्ससाठी राहते 'या' आलिशान हॉटेलमध्ये; एका दिवसाचा खर्च तब्बल १,५०,००० रुपये

NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांची मोठी प्रतिक्रिया; भाजपवर डागली तोफ

SCROLL FOR NEXT