Tanaji Sawant Saam tv
महाराष्ट्र

Tanaji Sawant News: 'खाते हसन मुश्रीफांकडे अन् प्रश्नावली मात्र माझ्यावर...' आरोग्यमंत्री तानाजी सावंत विरोधकांवर बरसले

Maharashtra Politics: मी मराठ्याची औलाद आहे वार केला की पलटवार करणारच... असेही तानाजी सावंत यावेळी म्हणाले.

Gangappa Pujari

रणजीत माजगावकर, प्रतिनिधी

Tanaji Sawant News:

नांदेड शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूनंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिंदे- फडणवीस- पवार सरकारच्या काळात आरोग्य व्यवस्थेचे तिन तेरा वाजल्याचा आरोप करत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावरुन आता तानाजी सावंत यांनीही विरोधकांवर टीका केली आहे.

काय म्हणाले तानाजी सावंत?

"राज्यात ज्या काही घटना घडल्या त्या घटनांमध्ये खाते हसन मुश्रीफ यांच्याकडे होते आणि प्रश्नावली मात्र माझ्यावर आली. हसन मुश्रीफ सेफ राहिले. अनेकांनी माझ्यावर टीका केली कुठे आहेत ठेकेमंत्री असे म्हटले, पण मी मराठ्याची औलाद आहे वार केला की पलटवार करणारच.." अशा शब्दात तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी विरोधकांवर पलटवार केला.

दुर्दैवाने मुख्यमंत्री झालात अन्...

यावेळी बोलताना तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला. "तुम्ही दोन वर्ष सरकार केवळ फेसबुकवरून घरात बसून सरकार चालवले. तुमच्या बुद्धिमत्तेची तुमची औकात काय आहे हे आम्हाला माहिती आहे. तुम्हाला फोटो काढण्याशिवाय दुसरे काही येत नाही, तुम्ही दुर्दैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात महाराष्ट्राला दहा वर्ष मागे नेलात.." अशी खोचक टीका तानाजी सावंत यांनी केली.

सर्व प्रश्नांची उत्तरे देणार...

नांदेड संदर्भात मला कोणतेही प्रश्न विचारू नका. या सर्व प्रश्नांची उत्तरे मी उद्या मुंबईत जाऊन देणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच राज्य शासन दिवाळीपर्यंत आरोग्य संदर्भात एक ॲप लॉन्च करणार आहे. खाजगी रुग्णालयांकडून होणाऱ्या रुग्णांची पिळवणूक थांबवण्यासाठी हे ॲप तयार केले जात आहे... अशी माहितीही तानाजी सावंत यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT