कोरोना नियम पाळा अन्यथा मोठ्या संसर्गाला सामोरं जावं लागेल; आरोग्यमंत्र्यांचा इशारा SaamTV
महाराष्ट्र

कोरोना नियम पाळा.. अन्यथा मोठ्या संसर्गाला सामोरं जावं लागेल; आरोग्यमंत्र्यांचा इशारा

लस न घेता प्रमाणपत्र वाटप ही गंभीर बाब असून या प्रकरणावरती चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे.

राजेश काटकर

परभणी : राज्याने डेल्टा व्हेरियंटवरती (Delta Variant) जवळजवळ मात केली आहे. मात्र जर वेळीच आपण ओमायक्रोन (Omicrona) या व्हेरियंटला थांबू शकलो नाही. तर आपल्याला मोठ्या संसर्गाला सामोरं जावं लागेल त्यामुळे नागरिकांनी कोविडचे नियम पाळणे गरजेचे असल्याचं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी परभणीत केलं ते एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन करण्यासाठी परभणी दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी सवांद साधताना ते म्हणाले, 'ओमायक्रॉन या व्हेरियंटचा प्रसार खूप जलद गतीने होत असून, साउथ आफ्रिकेत डेल्टा रिप्लेस करण्याचे काम या व्हेरियंटने केलं आहे.

हे देखील पहा -

त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून कोविड नियमांचे (Covid Rules) पालन करण्याचे आवाहन यावेळी टोपे यांनी केलं. लस न घेता प्रमाणपत्र Certificate वाटप ही गंभीर बाब असून त्यावर चौकशी करून कारवाई करण्यात येईल असही ते यावेळी म्हणाले.

लसीकरणासाठी (Vaccination) परभणीला आणखी वेग वाढवावा लागणार आहे . राज्यात 85 टक्के लोकांचा लसीकरण झालेला आहे. मात्र परभणीत पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ 71 टक्के आहे . त्यामुळे परभणीकरांना लसीकरण करून घेणे गरजेचे असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. दरम्यान टास्क फोर्सची बैठक लवकर घेण्यात येणार असल्याचही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : शरद पवार राजकारणातील महामेरू - संजय राऊत

Viral Video: आवाजावरून दोन गट एकमेकांना भिडले, हातात काठ्या आणि तलवारी घेऊन जोरदार राडा; पाहा VIDEO

IPL 2025 Auction साठी 1574 खेळाडूंनी नोंदवलं नाव! केव्हा, कुठे आणि कधी होणार ऑक्शन? जाणून घ्या

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृताच्या घरी नवीन पाहुणा कधी येणार? प्रेग्नेंसीबाबत दिली महत्त्वाची अपडेट

US Election Result 2024: डोनाल्ड ट्रम्प Vs कमला हॅरिस, आतापर्यंत कोणत्या राज्यात कोण विजयी?

SCROLL FOR NEXT