School saam tv
महाराष्ट्र

आरोग्य विभागाकडून पहिली ते सातवी चे वर्ग सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी

शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याबाबतच्या शासन निर्णय व त्यातील मार्गदर्शक सूचनांची आता प्रतीक्षा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सुशांत सावंत

मुंबई : 1 डिसेंबर पासून राज्यभरातील पहिली सातवीच्या शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग कडून जिल्हापरिषद महापालिका स्तरावर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी त्यासोबत जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत.

हे देखील पहा :

इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा राज्यभरात 1 डिसेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतल्यानंतर आता आरोग्य विभागाकडून याबाबत मार्गदर्शक सूचना शाळांसाठी काढण्यात आल्या आहेत. या सूचनांचे काटेकोरपणे पालन राज्यातील सर्व शाळांनी करायचे आहे. यानंतर शिक्षण विभाग या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून शिक्षण अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन याबाबत शासन निर्णय जारी करेल.

  • दोन विद्यार्थ्यांमध्ये शक्यतोवर किमान सहा फूट अंतर ठेवावे.

  • शाळेमध्ये प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे.

  • वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता ठेवावी.

  • शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.

  • शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिचा अवलंब करू नये.

  • शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम, खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात.

  • ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती असावी.

  • मुले किंवा शिक्षक आजारी असतील तर त्यांनी शाळेत येऊ नये, आवश्यक नियमांचे पालन करावे.

  • क्वारंटाईन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी.

  • शाळेतील एकाच वर्गातील पाचपेक्षा अधिक मुले दोन आठवड्याच्या कालावधीत कोरोना  बाधित आढळल्यास शाळेतील कोव्हीड प्रतिबंधक कृती योजनेचा सखोल आढावा घ्यावा.

  • शाळांनी वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे.

  • शाळेत येताना किंवा शाळा सुटल्यावर अथवा मोकळ्या वेळेत मुलांनी एकत्र येऊन नियमांचा भंग करू नये.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IDA Hike: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १ जुलैपासून महागाई भत्ता वाढला, जाणून घ्या किती वाढणार पगार

Maharashtra News Live Update: अंध भक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकलेले आहेत - उद्धव ठाकरे

‘अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले, ही तर संघर्षाची सुरुवात!’; शिवाजी पार्कातून उद्धव ठाकरेंचा थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

फक्त प्रेमच नाही, महिलांना नवऱ्याकडून हव्या असतात 'या' 5 गोष्टी

Kalu Waterfall News : मुसळधार पावसात काळू धबधब्यावर दुर्घटना; दोन ट्रेकर्सचा मृत्यू

SCROLL FOR NEXT