वाबळेवाडीच्या आदर्श जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक निलंबित! SaamTV
महाराष्ट्र

वाबळेवाडीचे निलंबित मुख्याध्यापक दत्तात्रय वारे चौकशी समिती समोर हजर

वारे यांच्या खात्यामध्ये 30 लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे रेकॉर्ड जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीला सापडले आहे.

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

पुणे :- पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये असलेल्या आणि आंतराष्ट्रीय पातळीवर नावारूपास आलेल्या आदर्श जिल्हा परिषद शाळा वाबळेवाडीचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत हि निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

हे देखील पहा :

वारे यांच्या खात्यामध्ये 30 लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे रेकॉर्ड जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीला सापडले आहे. या पार्श्वभूमीवर दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेकडून चौकशीसाठी आज बोलावण्यात आले होते. सध्या वारे यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या चौकशी समितीसमोर हजर राहून आपली बाजू मांडण्यासाठी आज दत्तात्रय वारे यांना बोलावण्यात आले होते.

दरम्यान, त्यांच्या खात्यात आलेल्या रकमांचे स्पष्टीकरण मागवणारी नोटीसही बजावण्यात आली होती. आपल्यावरील सर्व आरोप वारे यांनी नाकारले आहेत. 650 पानांचे स्पष्टीकरण आपण चौकशी समितीला दिले असून एक पैशाची ही अफरातफर आपल्याकडून झालेली नाही. तसेच पदरमोड करुन आपण शाळा उभारल्याचे वारे यांनी सांगितले आहे. तर त्यांच्याकडून आलेलं स्पष्टीकरण पाहून आपण निर्णय घेऊ असं जिल्हा परिषद सीईओ आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून मुलीवर बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT