सूरज सावंत
मुंबई : कफ परेड (Cough Pared) परिसरातून 3 महिन्याच्या बाळाची घरातून चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी (Cough Pared Police) आरोपी तृतीयपंथी कन्नया उर्फ कन्नू चौघुले आणि साथीदार काळे या दोघांना अटक केली आहे. बक्षीस न दिल्याच्या रागातून संबंधित व्यक्तीने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. (He buried 3-month-old baby girl in the creek)
कफ परेडच्या आंबेडकरनगर झोपडपट्टीत सचिन चितकोटे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. आई, वडिल, पत्नी, भाऊ आणि मुलं असा त्याचा परिवार आहे. 3 महिन्यापुर्वी चितकोटे परिवारात आर्याचा जन्म झाला. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. याबाबत आर्याचे आजोबा चंद्रकांत चितकोटे यांनी माहिती दिली आहे. घरात मुलीचा जन्म झाल्याचं कळाल्यानंतर परिसरात राहणारा तृतीयपंथी कन्हैया उर्फ कन्नू चौघुले हा सचिन यांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी आला. त्यावेळी त्याने कुटुंबियांकडे एक साडी आणि पैशांची मागणी केली. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे सध्या घरात पैशांची चण चण असल्याचे सांगत. दिवाळीत देऊ असे सचिनने सांगितले. याच गोष्टीचा राग अनावर झाल्याने तणतण करत कन्नू हा घराबाहेर पडला.
दरम्यान, सध्या पाऊस पडत नसल्यामुळे उकाडा वाढला आहे. मुलीला गरम होऊ नये म्हणून कुटुंब घराचा दरवाजा उघडा ठेवून पडघा ओडून झोपतात. याची माहिती कन्नूला होती. याच संधीचा फायदा घेऊन मध्यरात्री कन्नूने घरात घुसून आर्यांचं अपरहण केले. यात सोनूने त्याला मदत केली. त्यानंतर दोघांनी आर्याला कफ परेडच्या खाडीत जिवंत पुरून पळ काढला.रात्री घरात एक मांजर शिरली तिने घरातील एक प्लेट पाडल्यानंतर आल्याची आई ज्योत्स्ना यांना जाग आली. त्यावेळी आर्या शेजारी नव्हती. त्यानंतर कुटुंबियांनी आर्याची शोधा शोध सुरू केली. संशय कन्नूवर असल्याने त्याचाही शोध सुरू केला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिस आणि मुलीचे कुटुंबिय मागावर असल्याचे कळाल्यानंतर कन्नू स्वत:हून कफ परेड पोलिस ठाण्यात हजर राहिली. पोलिस तपासात गुन्ह्यांचा कबूली दिल्यानंतर आरोपींनी सोनूला ही शोधून काढले. पैसे न दिल्याच्या रागातूनच हे कृत्य केल्याची कबूली कन्नूने पोलिसांना दिली. या दोघांना कफपरेड पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.