hasan mushrif statement on rajendra patil yadravkar and rajesh tope meeting  saam tv
महाराष्ट्र

Kolhapur: 'ते एकनाथ शिंदेंना साेडून जाणार नाहीत' (पाहा व्हिडिओ)

या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

यड्रावकर हे शिंदे गटात असून ते सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंना सोडुन जाणार नाहीत असा ठाम विश्वास आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज (साेमवार) काेल्हापूर (kolhapur) येथे व्यक्त केला. माजी मंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) आणि माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांची जुनी मैत्री आहे. ते दाेघे भेटले असतील. ते सत्तेत असलेल्या शिंदे गटात असल्याने ते कूठेही जाणार नाहीत असेही मुश्रीफ यांनी नमूद केेले. (Maharashtra News)

माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे आणि माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यामध्ये बंद खोलीत जयसिंगपूर येथे रविवारी चर्चा झाली. या चर्चेचा नेमका तपशील समजू शकला नाही. सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि घडामोडीवर खलबते झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

या भेटीबाबत हसन मुश्रीफ यांनी दाेन्ही नेत्यांची जूनी मैत्री असल्याचे म्हटले. ते म्हणाले काेल्हापूर लाेकसभेच्या जागा जिंकण्यासाठी आम्ही तयारी सुरु केली आहे. दोन्हीही जागा सध्या तरी शिंदे सेनेकडे आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान सदाभाऊ, बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची नेते मंडळी भेट घेऊन समजूत काढतील. राजेंद्र पाटील आणि राजेश टोपे यांची जुनी मैत्री आहे. सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंना सोडुन ते जाणार नाहीत असेही मुश्रीफांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

SCROLL FOR NEXT