harshvardhan patil, Beed, Vinayak Mete
harshvardhan patil, Beed, Vinayak Mete saam tv
महाराष्ट्र

Vinayak Mete Accident Case : विनायक मेटेंनी मला वचन दिलं हाेतं : हर्षवर्धन पाटील

विनोद जिरे

बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरलीय. भाजप नेते हर्षवर्धन पाटील (harshvardhan patil) यांनी आज मेटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी पाटील यांनी मेटे यांच्या कार्याचा आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच घटनेची सखाेल चाैकशी हाेऊन सत्य समाेर आलं पाहिजे असं नमूद केले. (Vinayak Mete Latest Marathi News)

हर्षवर्धन पाटील म्हणाले विनायक मेटे यांचे मराठा आरक्षण असेल किंवा सारथी योजना असेल यासाठी मोठं काम आहे. सुपुर्ण राज्यात त्यांनी मोठी चळवळ उभी केली. त्यांच्या जाण्याने सामाजिक चळवळीतील एक लढाऊ नेतृत्व गेलंय अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली. युवकांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र अभ्यासिका, वसतीगृह अशा संकल्पना त्यांनी विविध जिल्ह्यात राबविल्या असंही पाटील यांनी नमूद केले.

आम्ही दाेघांनी 25 वर्ष काम केलं आहे. आमच्यात नेहमी विविध विषयांवर चर्चा हाेत असे. विधान परिषदेत देखील मी त्यांच्यासमवेत काम केले आहे. आठ दहा दिवसांपुर्वीच ते माझ्या मुंबईतील निवासस्थानी भाेजनासाठी येणार हाेते. परंतु कामामुळं त्यांना शक्य झालं नाही. त्यांनी 15 नंतर नक्की येईन असं मला सांगितलं हाेते असेही पाटील यांनी नमूद केले.

मेटे यांच्या अपघाताच्या संशयाची संदिग्धता दूर झाली पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सखाेल चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेचा सखाेल तपास व्हावा अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kitchen Hacks: लंचबॉक्समध्ये दिलेले सफरचंद काळे पडतेय? मग या टिप्स करा फॉलो

Elvish Yadav : एल्विश यादवच्या अडचणीत वाढ, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल

Special Report : Hatkanangale Lok Sabha | हातकणंगलेत होणार तिरंगी लढत

Uday Samant News | उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

Today's Marathi News Live : बीडमध्ये उष्णतेचा पारा वाढला; तापमान 42 अंशावर

SCROLL FOR NEXT