harshwardhan patil saam tv
महाराष्ट्र

Politics: हर्षवर्धन पाटलांना धक्का; NCP नं पाेखरलं इंदापूर

येत्या तीन एप्रिलला भाजपातून पदाधिकारी एनसीपीत प्रवेश करणार आहेत.

मंगेश कचरे

बारामती : पुणे (pune) जिल्ह्यातील इंदापूर (indapur) तालुक्यात भाजपला (bjp) गळती लागली असून भाजपाचे जेष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (harshwardhan patil) यांचे चुलत बंधू माजी सभापती प्रशांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमधून राष्ट्रवादी पक्षात (ncp) प्रवेश केला. (harshwardhan patil latest marathi news)

आता येत्या तीन एप्रिलला माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश होणार आहे. याच दिवशी इंदापूर पंचायत समितीच्या विद्यमान सभापती स्वाती बापूराव शेंडे यांचा देखील पक्षप्रवेश होणार असल्याने इंदापुरात भाजपला गळती लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

भाजपातून एकेक पदाधिकारी राष्ट्रवादीत जात असल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT