Maharashtra Politics  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : सुनेत्रा पवारांच्या पराभवामागे 'अदृश्य' हात; जावयाचा अजितदादांना 'गोलीगत' धोका, पाहा व्हिडिओ

Sharad Pawar Group News : बातमी हर्षवर्धन पाटलांनी केलेल्या गोप्यस्फोटाची. इंदापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत त्यांनी गौप्यस्फोट केला केलंय...लोकसभा निवडणुकीत अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांनी हात मिळवणी केली होती...दोन्ही नेत्यांनी सोबत बारामती मतदारसंघ पिंजून काढला होता..मात्र तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांनी केलेल्या वक्तव्यानं मोठी खळबळ माजली...

Tanmay Tillu

मुंबई : भाजपला सोडचिठ्ठी दिलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी गौप्यस्फोट केला. पक्ष बदलताच हर्षवर्धन पाटलांनी लोकसभेत सुप्रिया सुळेंच्या विजयात त्यांचा कसा अदृश्य सहभाग होता, याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांनीही बारामती लोकसभेच्या विजयाचं गुपित सर्वांसमोरच उघड केलं.

लोकसभा निवडणुकीवेळी हर्षवर्धन पाटील भाजपात होते. त्यांचा इंदापूर मतदारसंघ हा बारामती लोकसभेचा भाग आहे. लोकसभेला बारामतीमधून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार होत्या. मात्र, अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात 36 चा आकडा असल्यानं ते लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना कितपत मदत करतील, याबाबत साशंकता होती. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजकीय शिष्टाई करत अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात समेट घडवून आणला होता. केवळ हर्षवर्धन पाटलांचा हा दावाचं नाही तर आकडेही तेच दर्शवतात.

विधानसभा मतदारसंघ - सुप्रिया सुळे - सुनेत्रा पवार - लीड

दौंड - 92,064 - 65,727 - 26,337

इंदापूर - 1,14,020 - 88,069 - 25,951

बारामती - 1,43,941 - 96,560 - 47,381

पुरंदर - 1,25,948 - 90,667 - 35,281

भोर - 1,34,245 - 90,440 - 43,805

खडकवासला - 1,21,182 - 1,41,928 - 20,746

एकूण 1लाख 58 हजार 009 मतांच्या लीडसह सुप्रिया सुळेंनी लोकसभा निवडणुकीत बाजी मारली होती. यात हर्षवर्धन पाटलांच्या इंदापूरचाही सहभाग उल्लेखनीय आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत मावळसह बारामती तालुक्याचं राजकारण बदलताना पाहायला मिळणार एवढं नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT