Harshvardhan Patil Saam Digital
महाराष्ट्र

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांच्या मनसुब्यावर पाणी फिरणार?; ३ दिग्गज नेत्यांनी पाटलांविरोधात ठोकला शड्डू

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेतल्याने या विधानसभा मतदारसंघात रंगत आणखीच वाढली आहे. तुतारीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने व कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकल्याने हर्षवर्धन पाटलांच्या अडचणी वाढल्या आहेत.

पुणे जिल्हा बँक व इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी भक्कम नाळ असणारे अप्पासाहेब जगदाळे हे हर्षवर्धन पाटील यांचे नात्याने मामा आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीत अप्पासाहेब जगदाळे यांचे महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे. त्यांनीच त्यांच्या विरोधात शड्डू ठोकल्याने त्यांच्या विजयाच्या मनसुब्यावर पाणी फिरणार असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.

सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांचे शेतकऱ्यांशी सुलोख्याचे संबंध असून दुग्ध व्यवसायामुळे गावोगावी त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. इंदापूर तालुक्यामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात व दुग्ध व्यवसायामुळे इंदापूर तालुक्याच्या प्रगतीमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती म्हणून त्यांच्या कार्यकाळामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी इंदापूर तालुक्यासाठी खेचून आणण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये त्यांची क्रेझ देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने त्याचा देखील फटका हर्षवर्धन पाटील यांना बसणार आहे.

कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा हे इंदापूर शहरासह उजनी बॅक कॉटर परिसरामध्ये शेतकऱ्यांसह व्यापारी उद्योजक यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेत असतात त्यामुळे या भागावर त्यांचे प्राबल्य आहे त्यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गात अनेक अडसर उभे राहिले आहेत.

हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाने निष्ठावंतांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळती. हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला फायदा होईल की तोटा हे आता समजू शकत नाही मात्र इंदापूर तालुक्यात जी सहानुभूती राष्ट्रवादीची होती ती या प्रवेशामुळे कमी झाली आहे. निष्ठावंत असलेले आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने भरत शहा यांनी पत्रकार परिषद घेत हर्षवर्धन पाटील यांच्या बद्दलची नाराजी व्यक्त केली व तालुक्याला तिसरा पर्याय हवा यासाठी 11 तारखेला मेळावा आयोजित केला आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या वाटेत अडथळा निष्ठावंतांकडूनच निर्माण झालाय त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची वाट बिकट झाली असली तरी दत्तात्रय भरणे यांची लाईन क्लिअर झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान आमदारांच्या ५ कोटी पेक्षा जास्त नीधी आणल्याचा कामांचा गुणगौरव करताना राहिलेली कामे करण्याची आमच्यात आहे (अजितदादा पवार आणि दत्तात्रय भरणे) पुढे आसा नीधी आणू किंवा तसंच काहीसं बोलताना अप्रत्यक्ष रीत्या दत्तात्रय भरणे यांना एकप्रकारे विधानसभेसाठी लाईन क्लिअर करून टाकली..!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: रोज प्या कढीपत्त्याचा चहा, सर्व आजार जातील पळून

Mumbai Rain : नवरात्रीत परतीच्या पावसाचा दांडिया; अचानक बरसलेल्या सरींनी नागरिकांची उडाली तारांबळ, VIDEO

Ajit Pawar: स्वपक्षीय साथ देणार की पाठ दाखवणार? विधानसभेला अजित पवार यांची अग्निपरीक्षा; वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Politics : भुजबळ-कांदे, महायुतीचे वांदे; नाशकात महायुतीत कुरघोडीचं राजकारण, VIDEO

Health Tips: बुलेटप्रूफ कॉफी तुम्ही प्यायलात का? वाचा आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT