Smartphones Effects Of Child Saam TV
महाराष्ट्र

Smartphones Effects Of Child: सावधान! पालकांनो कधीच करू नका ही चूक; अन्यथा बाळाचं आयुष्य येईल धोक्यात

साम टिव्ही ब्युरो

गोपाल मोटघरे

Smartphone Side Effects On Child: अनेक पालक आपल्या लहान मुलांना रडूनये म्हणून खेळण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू देतात. मुलांचं मन रमावं म्हणून आता अनेक पालक आपल्या मुलांच्या हातात स्मार्टफोन देतात. अशात हे स्मार्टफोन मुलांच्या आरोग्यासाठी किती घातक आहेत याची धक्कादायक माहिती समोर आलीये. (Latest Smartphone Side Effects News)

नुकतेच सेपियन लॅबने केलेल्या सर्वेत अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. जे पालक आपल्या लहान मुलांना अगदी लहानपणापासूनच स्मार्टफोन हातात देतात, अशी मुलं सर्वेक्षणात अत्यंत रागीट आणि चिडचिडी असल्याचं समोर आलं आहे.

तसेच जीवनातील काही महत्त्वाच्या प्रसंगी त्यांच्यात योग्य निर्णय घेण्याची क्षमता देखील कमी होत असते. तसेच अशी मुलं रागाच्याभरात आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्याची देखील शक्यता असते, असे धक्कादायक निष्कर्ष या सर्वेक्षणात पुढे आले आहेत.

सेपियन लॅब ने केलेल्या सर्वेक्षणात लहान मुलांच्या तुलनेत प्रौढ व्यक्तींवर स्मार्ट मोबाईल फोन वापरण्याचे दुष्परिणाम हे कमी जाणवत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना निदान 18 वर्षांचे झाल्यानंतरच स्मार्टफोन द्यावा. तसेच पालकांनी आपल्या मुलांशी घरात जास्त संवाद साधावा. त्यांना वेळ द्यावा आणि त्यांचा आउटडोर सपोर्ट अँड फिजिकल ऍक्टिव्हिटीजमध्ये सहभाग करून घ्यावा असे या सर्वेक्षणात सांगण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune CA Death Case: सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

SCROLL FOR NEXT