डाकीण असल्याच्या संशयावरुन महिलेचा विवस्त्र करुन छळ; नंदुरबारमधील धक्कादायक प्रकार  SaamTvNews
महाराष्ट्र

डाकीण असल्याच्या संशयावरुन महिलेचा विवस्त्र करुन छळ; व्हिडिओतून धक्कादायक प्रकार समोर

व्हायरल व्हिडिओ नेमका कोणत्या गावातील आहे, याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने तपास सुरू

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : डाकीण (witch) असल्याच्या संशयावरुन एका महिलेला विवस्त्र करुन छळ केल्याचा अतिशय दुर्दैवी प्रकार व्हायरल व्हिडीओमुळे (Video) समोर आला आहे. गेल्या आठ दिवसांपासुन नंदुरबारच्या (Nandurbar) सोशल मिडीयात हा व्हिडीओ व्हायरल होत असून याबाबत मोठी टिकेची झोड उठत आहे. बोली भाषेवरुन घटना सातपुडा पर्वत रांगामधील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील पहा :

याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (ANIS) जिल्हाधिकाऱ्यांना (Nandurbar collector) निवेदन देत घटनेची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. ही घटना कुठली आणि संबंधीत पिडीत महिला कोण याबाबत पोलीस देखील तपास करत आहेत. या घटनेबाबत राज्य आणि केंद्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे अंनिसने स्पष्ट केले आहे.

नंदुरबारमध्ये डाकीण प्रथेबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत आणि त्यातुनच या महिलेसोबत हा दुर्दैवी प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा व्हिडीओ कुठला आणि यातील संबंधीत महिला (Woman) कोण याचा छडा लागल्यानंतरचे सर्व चित्र स्पष्ट होईल.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT