Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed: गेवराईत 75 फुटाचा तिंरगा झेंडा मार्च करत, 'हर घर तिरंगा' रॅली

देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पुर्ण होत असल्याने संपूर्ण देशभरात हर घर तिरंगा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

विनोद जिरे

बीड - देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पुर्ण होत असल्याने संपूर्ण देशभरात हर घर तिरंगा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत देशभरासह बीड (Beed) जिल्ह्यामध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत.

हे देखील पाहा -

बीडच्या गेवराई तहसील प्रशासनाच्या वतीने, तहसीलदार सचिन खाडे यांच्या नियोजनात, शहरामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 75 फूट तिरंगा झेंडा मार्च काढत, हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली. यामध्ये 40 शाळेतील विद्यार्थ्यांसह, शिक्षक, पालक, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या रॅली दरम्यान भारत माता की जय,एक रुपया चांदीका देश हमारा गांधीका , वंदे मातरम् आशा घोषणांचा जयघोष करण्यात आला.यावेळी शाळकरी मुलांनी विविध वेशभूषा साकरल्या होत्या. देशभक्तीची भावना देशातील तसेच शहरातील नागरिकांमध्ये रुजावी याकरीता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Tanning Removal Tips: शरीरावर मळ जमा झालाय? मान, कोपर आणि गुडघ्यावरचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपा उपाय

Video : वाहतूक पोलिसाने मागितली ५ हजारांची लाच; मुंबईतील पोलीस खात्यात खळबळ

Shocking : दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना! १९ भाविकांचा मृत्यू; ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं?

Geyser Safety : गिझर ठरतोय 'सायलेंट किलर'! ही 7 कामे करा, नाहीतर होऊ शकतो भीषण स्फोट

Hands Numb : रात्री झोपताना हात सुन्न होतात? 'या' ५ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

SCROLL FOR NEXT