Beed Police Suspension Saam TV
महाराष्ट्र

गुटखा पकडायला गेले अन् सस्पेंड झाले; पोलिसांवरच ही वेळ का आली? वाचा...

पोलीस अधीक्षकांनी या पोलिसांचं तडकाफडकी निलंबन केलं आहे.

विनोद जिरे

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुटख्याच्या कारवाईतील गुटखा, चक्क पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीच पळवल्याचा उघड झालं आहे. हा गुटखा पळवणाऱ्या अधिकाऱ्यांसह पोलीस (Police) कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकांनी चांगलाच दणका दिला. पोलीस अधीक्षकांनी या पोलिसांचं तडकाफडकी निलंबन केलं आहे. (Beed Crime News)

बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलिसांना, गुटख्याचा कंटेनर अडवायला पाठविले होते. मात्र पोलिसांनी तो अडवल्यानंतर त्यातील 50 पोते गुटख्याऐवजी, कारवाईत केवळ 27 पोते दाखविला आणि 23 पोते गुटखा पाटोदा शहरातील हुले कन्स्ट्रक्शन कार्यालयात पसार केला. ही बाब समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी संबधित पोलिसांचं निलंबन केलं.

सहायक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर, पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर आणि कृष्णा डोके अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. त्यांच्या निलंबन आदेशातचं हे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे . (Beed Todays News)

दरम्यान बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसात, आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाने गुटख्याच्या अवैध धंद्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र अनेक ठिकाणी गुटखा व्यापाऱ्यांना पोलिसांचेच अभय असल्याची चर्चा सातत्याने होत असते. त्याचा प्रत्यय आता बीडच्या पाटोदा येथील कारवाई समोर आलाय.

वाळू नंतर आता गुटख्याच्या अवैध धंद्यात, काही पोलीस देखील आपले हात ओले करत असल्याचं भेसूर वास्तव समोर आलं आहे. त्यामुळं अशा पोलिसांवर देखील कडक कारवाई करावी, अशीच मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT