Sharad pawar And Gunratna sadavarte saam tv
महाराष्ट्र

राष्ट्रपती पदासाठी उंची लागते, सदावर्तेंनी केली शरद पवार यांच्यावर खरमरीत टीका

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.

जयेश गावंडे

अकोला : राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता विधानपरिषद आणि राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Elections) भाजपसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. मात्र अत्यंत उत्कंठावर्धक आणि देशातील प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपसह (BJP) विरोधीपक्षांनी मोट बांधायला सुरुवात केलीय. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीसाठी भाजपविरोधी आघाडीमध्ये तुफान चर्चा रंगली होती. त्यानंतर आपण राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार नसणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले होते. परंतु, सिल्व्हर ओक आंदोलना प्रकरणी वादात सापडलेले गुणरत्ने सदावर्ते यांनी पुन्हा एकदा पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

माध्यमांशी बोलताना सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. सदावर्ते म्हणाले, मेडिकलच्या प्रवेशासाठी सीईटीची परीक्षा होते. आयएएस होण्यासाठीही परीक्षा असते मला वाटते की, वाजवण्यासाठी चर्चा ठीक आहे. परंतु राष्ट्रपतिपदासाठी बौद्धिक पातळी आवश्यक आहे. शरद पवार यांना चर्चेतून वाजवलं जातंय, अशी टीका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर केलीय.

सरावर्ते पुढे म्हणाले, राष्ट्रपती पदावर उंची गाठलेली माणसं होती. शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार ते वयोवृद्ध आहेत. त्यांनीच सांगावं त्यांच्याकडे कुठली उंची आहे, असा प्रश्न विचारत सदावर्ते यांनी शरद पवार यांची खिल्ली उडवली. कारण राष्ट्रपती पदासाठी उंची लागते त्यामुळे त्यांनीच विचार करावा, या पदावर जायचे की नाही, असेही सदावर्ते म्हणाले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rasgulla Recipe: मऊसूत आणि टेस्टी रसगुल्ला घरच्या घरी बनवा फक्त ३० मिनिटांत

Maharashtra Live News Update अमरावतीत 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा

माता न तू वैरिणी! चिमुकलीला अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच आई...; ठाण्यातील खळबळजनक घटना|VIDEO

Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

MNS : मराठी असूनही ते एका मराठी मुलीलाच टार्गेट करत आहेत, मनसे नेत्याच्या मुलाकडून शिवीगाळ; इन्फ्लूएन्सरने सांगितली आपबिती

SCROLL FOR NEXT