माहिम किल्ल्यावर राहणाऱ्या 'त्या' रहिवाशांचं पुनर्वसन होणार, आदित्य ठाकरे म्हणाले...

मुंबईतील माहिम किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
Aditya Thackeray
Aditya Thackeray Saam TV

सुशांत सावंत

मुंबई : ऐतिहासिक माहिम किल्ल्याचं संवर्धन (Mahim Fort) करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून त्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज मंत्रालयातील दालनात पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग आणि मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांसोबत संयुक्त आढावा बैठक घेतली .या बैठकीत माहिम किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करून ,१९७०-७२ पासून किल्ल्यावरील वास्तव्यास असणाऱ्या राहिवाशांचं अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आदेश आदित्य ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत .

Aditya Thackeray
PM मोदींवर केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य काँग्रेस नेत्याला भोवलं; पोलिसांनी केली अटक, त्यानंतर...

मिळालेल्या माहितीनुसार, किल्ल्यावरील संरचनेची संख्या निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण केलं गेलं आहे .त्यानुसार या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ ३७९६.०२ चौ.मी. इतकं आहे . तर किल्ल्यावर एकूण अंदाजे २६७ संरचना आहेत .किल्ल्यावर असणाऱ्या ३१४ सदनिकांना नोटीस जारी करण्यात आल्या असून अंतिम परिशिष्ट-II नुसार २२२ झोपडी पात्र आहेत.दरम्यान नोटीस जारी केल्यानंतर झोपडीधारकांनी छाननीसाठी कागदपत्रे सादर केली आहेत आणि त्यांची छाननी सीनियर कॉलनी ऑफिसर,जी/उत्तर वॉर्ड यांच्यामार्फत सुरू आहे.

Aditya Thackeray
Maharashtra Corona: महाराष्ट्रात कोरोना फोफावतोय! नव्या रुग्णसंख्येमुळं नागरिकांचं टेन्शन आणखी वाढलं

माहिम किल्ल्यावरील झोपड्या झोपडपट्टी धारकांनी खाली केल्यानंतर किल्ल्यावरील झोपड्या पाडण्यास सुरुवात होईल. संपूर्ण प्रक्रियेचं माहितीपट तयार करण्यासाठी मेसर्स खाकी टूर्सची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यानंतर माहीम किल्ल्याच्या जीर्णोद्धाराची योजना आणि प्रस्ताव किल्ला रिकामा केल्यावरच एमसीजीएम पॅनेल केलेले पुरातत्त्व सल्लागार नेमून केले जातील .प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मंजुरी, MCZMA, ASI आणि इतर संबंधित प्राधिकरणांची NOC प्राप्त करण्यात येतील.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com