Gunaratan Sadavarte’s controversial remarks comparing Raj Thackeray to Ajit Pawar’s “foot dust” spark political storm in Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Gunaratna Sadavarte Slams Raj Thackeray: वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. राज ठाकरे “अपयशी राजकारणी” असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवाय त्यांनी अजित पवार यांची मिमिक्री करण्यावरूनही राज ठाकरेंवर टीका केली आहे.

Bharat Jadhav

  • गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

  • राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस.

  • सदावर्तेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते हे राज ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. आज पुन्हा त्यांनी राज ठाकरेंना डिवचलंय. राज ठाकरे हे राजकारणातील नापास माणूस आहेत. अजित पवार यांच्या राजकीय वजनाच्या पायाच्या धुळीप्रमाणे राज ठाकरे आहेत, असं म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना डिवचलंय. अजित पवार किती वेळा उपमुख्यमंत्री राहिलेत, तर राज ठाकरे काय आहेत.

अजित पवारांची मिमिक्री करुन मते मिळत नाहीत, असे म्हणत सदावर्तेंनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. सदावर्ते यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्यांच ठरणार आहे.

अगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान त्याआधी मतदार याद्यांवरून विरोधकांनी राज्यातील राजकीय वातावरण तापवलंय. मतदार याद्यांमधील घोळाबाबत अनेक तक्रारी विरोधकांनी केल्या आहेत. निवडणुक आयोगाला त्याबाबत निवेदन देऊन त्यात दुरुस्ती करावी, जर सुधारित याद्या येत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दिल्यानंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी राज ठाकरेंनी अजित पवार यांची मिमिक्री केली होती. आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंनी केलेल्या मिमिक्रीवरुन त्यांच्यावर टीका केली आहे. त्यानंतर बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. नथुराम गोडसे यांच्या विचारांशी आपला डीएनए असल्याचं म्हटलंय.

पंडीत नथुराम गोडसे यांच्या विचारांसाठी आनंद दिघे कोर्टात लढले होते. त्याममुळेच आनंद दिघे, एकनाथ शिंदे आणि आमचा डीएनए एक आहे असे सदावर्ते म्हणालेत. पंडीत नथुराम गोडसे यांच्या विचारांसाठी आनंद दिघे लढले होते. दिघे यांच्या विचारांचे एकनाथ शिंदे आणि मी आहे असे सदावर्ते म्हणाले आहेत. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

SCROLL FOR NEXT