Gulabrao Patil Saam tv
महाराष्ट्र

Gulabrao Patil : भुजबळ भाजी तर नारायण राणे कोंबडी विकायचे; गुलाबराव पाटील यांच्या विधानानं चर्चेला उधाण

Gulabrao Patil : गुलाबराव पाटील यांच्या विधानानं चर्चेला उधाण आलं आहे. भुजबळ भाजी तर नारायण राणे कोंबडी विकायचे, असं यावेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Vishal Gangurde

ऐन निवडणुकीत गुलाबराव पाटील यांचं दिग्गज नेत्यांवर वक्तव्य

छगन भुजबळ आणि नारायण राणेंचा इतिहास सांगितला

गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

ऐन निवडणुकीत गुलाबराव पाटील यांनी दिग्गज नेत्यांचा भूतकाळ सांगितला आहे. छगन भुजबळ भाजी विकायचे. तर नारायण राणे कोंबडी विकायचे, असे उदाहरण देत बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केल्याचं वक्तव्य केलं आहे. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने स्थानिक राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

नाशिकच्या भगूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थिती लावली. शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. भगूरमध्ये भाजप,अजित पवार गट विरुद्ध शिवसेनेमध्ये थेट लढत आहे. याच ठिकाणी उमेदवाराच्या प्रचारसभेत गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं.

गुलाबराव पाटील यांच्या भाषणातील मुद्दे

पहिल्यांदा बायको नवऱ्याकडे पैसे मागायची. आता नवरा बायकोकडे पैसे मागतो. ही निवडणूक शहर विकासाची आहे. अर्ध्यरात्री रक्त देणारे माणसे तुमच्यासमोर उभी केली आहेत. आता मटण देतील. मटण त्यांचे खा आणि बटन आपले दाबा. ज्याचा बँड वाजवायचा आहे. लोकांनी ठरवलं आहे. त्याच्याकडे फक्त पैसा आहे. विधानसभा निवडणुकीआधी लक्ष्मी आली. आताही तुम्हाला लक्ष्मी मिळेल. तुम्ही घराबाहेर झोपा.

आता भांडण लावतील, मुसलमान बांधवाना सांगतील, शिवसेनावाले हाबू आहे. लहान मुलांना भीती घालताना तशी भीती घालतात. शिवसेना कधी जातपात बघत नाही. नगरपालिका निवडणूक कठीण, खून का बदला खून, तसं इसने मेरे बाप को हराया, मै इसको हरावू. आम्ही आता पाणी योजना आणली, ती आमची योजना आहे. यावेळेस मुस्लिम मात्र जरा कमी मिळाली. आम्ही त्यांना विचारले काय झाले.

आता तर नगरविकास खाते आपल्याकडे आहे, नगरविकास खाते मे माल है. मी मतदारसंघात बौद्ध विहार कामे केली. सर्व समाजासाठी कामे केली, शिंदे साहेबांनी 350 कोटी रुपये मतदारसंघात दिले. तिकडे मुंडकं भाजपचे, हात राष्ट्रवादीचे, कमर उबाठाचे, पाय मनसेचे. आपल्याकडे एक सरळ आहे, सरसकट शिवसेना आहे. त्यांचे लव्ह मॅरेज टिकेल का? रात्री 4 वाजेपर्यंत पक्षाचा सरकारचं काम करणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आहे.

मला अजित पवारांनी विचारले, विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी भगूरला जाऊ का? मी सांगितले जावा. पाणीपुरवठा योजनेचे घोषणा केली, शहण्यासारखे वागावे, दुसऱ्याचे पोर आपले सांगू नये. आम्हाला तर गद्दार खोके, काय काय ऐकावे लागले, हे निवडून येणार नाही असे म्हणत होते. पण आम्ही निवडून आलो आणि मंत्रीही झालो. विजय करंजकर यांना म्हटले, आमच्या सोबत ये, तेव्हा आले नाही. आता उशिरा आले. राज कपूर यांनीही आपले गाणे बदलले. हम ऊस देश के वासी है, जिस देश मे गंगा बहती है, त्यानंतर गाणे केले राम तेरी, गंगा मैली हो गई.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आमदार चिखलीकर यांना भविष्यात मोठी जवाबदारी मिळणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले संकेत

भाजप प्रणित NDAला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची कारला धडक, २ जवानांसह ५ जणांचा मृत्यू

Dudhi Bhopla Sweet Dish : दुधी भोपळ्याचा हलवा तर खाल्ला असाल, मग एकदा ट्राय करा 'ही' स्वीट डिश

WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभवाचा भारताला जबरदस्त धक्का, WTC शर्यतीत पाकिस्ताननंही टाकलं मागे

SCROLL FOR NEXT