Rahul Gandhi On Share Market Price 
महाराष्ट्र

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Rahul Gandhi: विधानसभा निवडणुकीत बेरोजगारीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी महायुतीवर हल्लाबोल केलाय.. त्यातच गुजरातने महाराष्ट्रातील 5 लाख नोकऱ्या पळवल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय.. नेमकं राहुल गांधी काय म्हणाले आहेत? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहचलाय. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. त्यातच संविधान बचावच्या मुद्द्याबरोबरच राहुल गांधींनी बेरोजगारीच्या मुद्द्याला हात घालत भाजपवर हल्लाबोल केलाय. राहुल गांधींनी पहिल्यांदाच महाराष्ट्रातून गुजरातला जाणा-या उद्योगाच्या मुद्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय. गुजरातने महाराष्ट्रातील तब्बल 5 लाख नोकऱ्या पळवल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात करार झालेले उद्योग महायुतीचं सरकार आल्यानंतर गुजरातने पळवल्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असतात. मात्र आता राहुल गांधींनी महायुती सरकारच्या काळात गुजरातने पळवलेल्या नोकऱ्यांची कुंडलीच जाहीर केलीय..

'गुजरातने पळवल्या 5 लाख नोकऱ्या'

वेदांता फॉक्सकॉन - 10 हजार रोजगार

टाटा एअरबस - 10 हजार रोजगार

आयफोन प्रकल्प - 75 हजार रोजगार

बल्क ड्रग्ज पार्क- 80 हजार रोजगार

गेल पेट्रोकेमिकल प्रोजेक्ट- 21 हजार रोजगार

इतर प्रकल्प- 3 लाख रोजगार

एकूण - 5 लाख रोजगार

लोकसभा निवडणुकीत संविधान बचावसोबत महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्याचा महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला होता. त्यानंतर आता राहुल गांधींनी महाराष्ट्रातील रोजगार गुजरातने पळवल्याचं सांगत त्याची आकडेवारीच मांडल्याने महायुतीची डोकेदुखी वाढणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे महायुती राहुल गांधींच्या टीकेला कसं उत्तर देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

SCROLL FOR NEXT