Maharashtra News Saam Tv
महाराष्ट्र

...अन् संपूर्ण महाराष्ट्र जागेवरच थांबलं; राज्यभरात ठीकठिकाणी समूह राष्ट्रगीत गायन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला राज्यात ठीकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समूह राष्ट्रगीत गायनाचे आवाहन केले होते या आवाहनाला राज्यात ठीकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला.

पुण्याच्या ग्रामीण भागातुन चांगला प्रतिसाद

खेड आंबेगाव जुन्नर शिरुर तालुक्यातील गावागावात नागरिकांनी एकत्र येत गावच्या मंदिरात राष्ट्रगीताचे गायण केले. यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा होत असताना देशभक्ती प्रथम असं म्हणत शेतकरी वर्गातील नागरिकांनी सहभाग घेतला.

परभणीत राष्ट्रगीत,ग्रामस्थांसह भक्तांनी घेतला सहभाग

देश स्वातंत्राचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. याचाच एक भाग म्हणून आज अकरा वाजता सार्वजनिक राष्ट्रगीत गाण्यात आले. या मध्ये ग्रामीण भागात मोठा उत्साह दिसून आला. पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथे मंदिरात श्री संत मोतीराम महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सुरू आहे. ग्रामस्थांसह भक्तांनी काल्याचे कीर्तन थांबवून राष्ट्रगीताचे नमन केले.

बीडमध्ये अपंग व्यक्तीने देखील लावली 'जण गन मन' म्हणण्यासाठी हजेरी..!

बीड जिल्ह्यात आज सामूहिक राष्ट्रगीत गायन संपन्न झालं आहे. जिल्ह्यात सर्वत्र राष्ट्रगीताचे आयोजन करण्यात आलं होतं. आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, राष्ट्रगीत समूह गायन म्हणण्यात आलं. यावेळी निवृत्त भारतीय जवान यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार, अधिकारी, कर्मचारी आणि अपंग नागरिक देखील सहभागी झाले होते. यावेळी सकाळी 11 वाजता या राष्ट्रगीताला सुरुवात झाली होती. यामुळं परिसरात देशभक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचं पहायला मिळाले.

हे देखल पाहा -

सांगली महापालिका क्षेत्रात एकाच वेळी पार पडलं समूह राष्ट्रगीत गायन

सांगली महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात समुह राष्ट्र गायन पार पडले. एकाच वेळी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिक,शाळा,विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था व खासगी आस्थापना याठिकाणी समूह राष्ट्रगीत गायन पार पडले. पोलिसांनी सुद्धा राष्ट्रगीत म्हंटले. अकरा वाजता शहरातल्या अनेक ठिकाणीही समूह राष्ट्रगीत गायन पार पडले. जन गण मन सुरू होताच अनेक ठिकाणी नागरिकांनी स्तब्ध राहून समूह राष्ट्र गायनामध्ये सहभाग घेतला.

एक मिनिट थांबले उल्हासनगरकर

स्वातंत्राच्या 75 व्या अमृतमहोत्सवानिमित्त आज सकाळी 11 वाजता राज्यभरात सामूहिक राष्ट्रगीत घेण्याचे आवाहन राज्य शासनाने केले होते. याला उल्हासनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद देत एक मिनिटे आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीताचे गायन केले शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या गजानन मार्केट ,नेहरू चौक आणि सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये सामूहिक राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.

औरंगाबादेत सामुहिक राष्ट्रगीत; एक मिनिट थांबले औरंगाबादकर

स्वराज्य महोत्सवानिमित्त आज सकाळी 11 वाजता राज्यभरात सामूहिक राष्ट्रगीत घेण्याचे आवाहन राज्य शासनाने केले होते. याला औरंगाबादकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एक मिनिटे आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीताचे गायन केले. शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या मध्यवर्ती बस स्थानक, सिडको बस स्थानक, बाजारपेठ, विद्यापीठ आणि सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये सामूहिक राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.

नवी मुंबई मनपा मुख्यालयात सामूहिक राष्ट्रगान

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यभर सामूहिक राष्ट्रगीत गायन आयोजित करण्यात आले असून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद भेटलाय. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अँम्पीथेटर मध्ये सर्व मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक राष्ट्रगीताचे गायन केले. 11 वाजता स्वराज्य महोत्सव अंतर्गत आयोजित समूह राष्ट्रगान उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. मनपा मुख्यालयासह विभाग अधिकारी कार्यालय, पोलिस स्थानक याठिकाणी देखील समूह राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.

शिर्डीतील साईमंदिरातही सकाळी अकरा वाजता सामुहिक राष्ट्रगीत गायन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानंतर आज राज्यभर सामुहिक राष्ट्रगाण गायलं गेलंय . शिर्डीतील साईमंदिरातही सकाळी अकरा वाजता सामुहिक राष्ट्रगीत गायलं गेलं.. साईमंदिराजवळ पार पडलेल्या या राष्ट्रगीतात साईसंस्थानच्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत, संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस आणी हजारो साईभक्‍त सहभागी झाले होते...

जालना जिल्हाअधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात समूह राष्ट्रगीत गायन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवातंर्गत ‘समूह राष्ट्रगीत गायन’ हा उपक्रम जिल्ह्यात आज राबविण्यात आला या वेळी जिल्हा अधिकारी कार्यालयात आज सकाळी अकरा वाजता सर्व कार्यालयातील अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,विद्यार्थी,पालक आणि नागरिकांनी एकत्र येत समूह राष्ट्रगीत गायन’ केलं.

अकोल्यात सामूहिक राष्ट्रगीत, अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, आज राज्यभर सामूहिक राष्ट्रगीत गायन आयोजित करण्यात आले होते.अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सामूहिक राष्ट्रगीत कार्यक्रम पार पडला. ठीक अकरा वाजता नियोजन सभागृहात राष्ट्रगीत सुरू झाले. नियोजन सभागृहात प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थितीती होती. दरम्यान यावेळी सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

SCROLL FOR NEXT