Viral News Saam Tv News
महाराष्ट्र

Shocking News: भावी नवरदेवांच्या नशिबात 'सिबिल स्कोअर'चा दोष; कुंडली नव्हे क्रेडिट हिस्ट्री पाहून मोडलं लग्न

Groom Rejected for Marriage: वर आणि वधू्च्या कुटुंबात लग्नाबाबत चर्चा सुरू होती. या दरम्यान, वधूच्या काकांनी वराचा सिबिल स्कोअर विचारला. सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे लग्न मोडण्यात आले.

Bhagyashree Kamble

खराब सिबिल स्कोअरमुळे आपल्याला बँकांनी कर्ज देण्यास नकार दिल्याचे आपण ऐकलं असेल, पण कधी लग्नासाठी कुणाला नकार मिळाला असल्याचं ऐकलं आहे का? महाराष्ट्रात मूर्तिजापूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, वर आणि वधू्च्या कुटुंबात लग्नाबाबत चर्चा सुरू होती. या दरम्यान, वधूच्या काकांनी वराचा सिबिल स्कोअर विचारला. सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे लग्न मोडण्यात आले.

काकांनी पॅन कार्ड नंबर घेतला आणि वराचा सिबिल स्कोअर तपासला. यानंतर वधूच्या कुटुंबाने लग्न करण्यास नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार, वराच्या नावावर अनेक कर्ज आहेत. ही बाब समोर आल्यानंतर वधूच्या कुटुंबाला धक्काच बसला. तरूणाने विविध बँकांकडून कर्ज घेतले होते. याशिवाय त्याचा सिबिल स्कोर देखील खूप खराब होता. तरूण कर्ज फेडण्यासही डिफॉल्टर असल्याचं समोर आलं.

यावर वधूच्या काकांनी सांगितले की, वराला आधीच आर्थिक समस्या आहे. तो त्याच्या पत्नीला आर्थिक सुरक्षा देऊ शकणार नाही. यानंतर वधूच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही या निर्णयाशी सहमती दर्शवली. तसेच लग्नाचा प्रस्ताव रद्द केला. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली.

सिबिल स्कोअर काय असतो?

सिबिल स्कोअर हा तीन अंकी क्रमांक आहे. जो एखाद्या व्यक्तीच्या क्रेडिट इतिहासाचा सारांश देतो. उच्च सिबिल स्कोअर म्हणजे आर्थिक बाजू चांगले असणे. एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट इतिहास तपासण्यासाठी सिबिल स्कोअर आपण चेक करू शकतो. तो व्यक्ती वेळेवर कर्ज फेडू शकते की नाही हे सिबिल स्कोअरवरून समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : अडथळे दूर होतील, कामाच्या ठिकाणचा ताण वाढेल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

SCROLL FOR NEXT