Grampanchayat Elections 2022, Nanded, Himayatnagar saam tv
महाराष्ट्र

Grampanchayat Elections 2022 : ग्रामपंचायत सदस्याने ग्रामसेवकास चाेपलं; संघटना आक्रमक

शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस हाेता.

संतोष जोशी

Grampanchayat Elections 2022 : निवडणुकीसाठीची आवश्यक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका ग्रामपंचायत सदस्याने ग्रामसेवकाची चांगलीच धुलाई केली. ही घटना शुक्रवारी हिमायतनगर येथे घडली. या मारहाणीचा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. (nanded latest marathi news)

नांदेड जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचे (election) रणधुमाळी सुरु आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दरेगावच्या ग्रामपंचायत (grampanchayat) सदस्याने ग्रामसेवकास कागदपत्रांची मागणी केली मात्र, ग्रामसेवक कागदपत्र देण्यास टाळाटाळ करत होता.

अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आणि काही वेळ शिल्लक असल्याचे माहित असताना ग्रामसेवक कागदपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याने संतापलेल्या ग्रामपंचायत सदस्याने भर रस्त्यात ग्रामसेवकांच्या धुलाई केली. दरम्यान या घटनेनंतर ग्रामसेवक संघटना आक्रमक झाली आणि ग्रामपंचायत सदस्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office MIS Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! नवरा-बायकोला दरमहा मिळणार ₹९,२५०; वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra News Live Update : अकोला जिल्ह्यात बजाज फायनान्सविरोधात वंचित बहुजन आघाडीचे लोटांगण आंदोलन

Garba Special Blouse Designs: नजरेत भरेल असं सौंदर्य! गरब्यासाठी लेहेंग्यावर उठून दिसतील असे 5 बॅकलेस ब्लाऊज

भाजपला मोठा धक्का! गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज रद्द; राजकारणात खळबळ|VIDEO

Kidney health: तुमच्या किडनीला होऊ शकतो धोका; या ७ वाईट सवयी आताच सोडा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT