Villagers discussing governance issues as questions arise over sarpanch performance and accountability. saam tv
महाराष्ट्र

Grampanchayat: गावचा सरपंच काम करत नाही? बिनकामाच्या सरपंचाला पदावरून कसं हटवायचं? काय आहे कायदा?

Gram panchayat Rules : सरपंच आपले कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी झाल्यास गावकरी काय करू शकतात? भारतातील सरपंचाला पदावरून दूर करण्याची कायदेशीर प्रक्रिया, ग्रामसभेचे अधिकार आणि नियमांबद्दल जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • सरपंच गावाच्या विकासासाठी जबाबदार असतो

  • काम न केल्यास सरपंचाला हटवण्याची कायदेशीर तरतूद

  • ग्रामसभेद्वारे अविश्वास ठराव मांडता येतो

गावात विकास कामे करणं आणि गावाचा विकास करण्यात ग्रामपंचायतीची भूमिका महत्त्वाची असते. ग्रामपंचायतीचा प्रमुख सरपंच असतो. यामुळे गावाचा विकास घडविण्यात सरपंचाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. परंतु अनेक गावातील सरपंच हे पुढारीपण मिरवण्यात व्यस्त असतात. पण गावाचा विकास करण्यात ते पुढाकार घेत नाहीत.

गावातील पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि विकासकामे यांचे नियोजन करणे ही त्याची मुख्य कर्तव्ये असतात. सरपंचाची निवड थेट ग्रामस्थांकडून मतदानाद्वारे केली जाते. पण जर सरपंचाने गावाच्या प्रगतीसाठी कामे केली नाहीत तर त्याला त्याच्या पदावरून हटवता येते का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याबाबत आपण जाणून घेऊ.

सरपंचावर कारवाई होते का?

कोणत्याही व्यक्तीला थेट सरपंचाला पदावरून काढता येत नाही. त्यासाठी ग्रामपंचायतीत अधिकृत प्रक्रिया राबवावी लागते. सरपंचाला पदावरून हटवणे ही सोपी प्रक्रिया नसते. त्यासाठी ठोस पुरावे, योग्य कारणे आणि कायदेशीर प्रक्रिया आवश्यक असतात. चुकीच्या पद्धतीने तक्रार केल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते.

अविश्वास ठराव

जर समजा सरपंच गावाच्या विकासासाठी काम करत नसेल, निधीचा गैरवापर करत असेल. कायद्याचे उल्लंघन करत असेल, तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. त्यासाठी ग्रामपंचायतीत अधिकृत प्रक्रिया राबवावी लागते. गावकऱ्यांना सरपंचाला पदावरून हटवण्याचा अधिकार असतो. पण त्यासाठी अविश्वास ठराव मांडावा लागतो.

अविश्वास ठार प्रक्रिया

ग्रामपंचायतीतील किमान ३ सदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस द्यावी लागते.ही नोटीस संबंधित पंचायत राज अधिकाऱ्यांकडे सादर दिली जाते. चौकशीनंतर सरपंचाला नोटीस पाठवली जात असते. ३० दिवसांच्या आत विशेष सभा बोलावण्यात येते, यासभेची माहिती किमान १५ दिवस आधी देणे आवश्यक असते.

दरम्यान अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या किमान २/३ सदस्यांची उपस्थिती आवश्यक असते. सरपंचाविरोधात ठराव मंजूर होण्यासाठी आवश्यक बहुमत मिळणे आवश्यक असते. पुरावे आणि ठोस कारणे असल्यास ठराव यशस्वी होत असतो. सरपंच पदावरून हटवल्यानंतर उपसरपंच तात्पुरता कारभार पाहतो. त्यानंतर ६ महिन्यांच्या आत नव्या सरपंचाची निवडणूक घेतली जात असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

SCROLL FOR NEXT