Laxman Hake Saamtv
महाराष्ट्र

VIDEO: जरांगेंना रेड कार्पेट, ओबीसींना दुजाभाव, राज्यात सरकारपुरस्कृत कुणबी घोटाळा; लक्ष्मण हाकेंच्या आरोपांनी खळबळ

OBC leader Laxman Hake: मनोज जरांगेंचं आंदोलन स्थगित करण्यासाठी सरकारला यश मिळालं असलं तरी आंतरवली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री गावात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषण सुरु केलंय.

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा जोरदार गाजतोय. त्यातच मनोज जरांगेंचं आंदोलन स्थगित करण्यास सरकारला यश मिळालं असलं तरी त्याच आंतरवली सराटीच्या वेशीवर वडीगोद्रीत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी उपोषण सुरु केलंय. दरम्यान राज्यात बोगस कुणबी घोटाळा झाल्याचा आरोप करून लक्ष्मण हाकेंनी खळबळ उडवून दिलीय. सरकार पुरस्कृत बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरु आहे, असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय.

सरकारने माजी न्यायमुर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून मराठा समाजातील 57 लाख कुणबी नोंदी आढळलेल्यांना प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली. त्यावर ओबीसी नेत्यांनी आक्षेप घेतला. आता त्याविरोधात हाकेंनी थेट आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय.

तसंच मनोज जरांगेंसाठी सरकार रेड कार्पेट टाकत असून ओबीसींबाबत दुजाभाव करत असल्याचा आरोपही हाकेंनी केलाय. त्यामुळे सरकारनं सगळ्या आंदोलनांना सारखीच वागणूक द्यावी, अशी अपेक्षा पंकजा मुंडेंनी व्यक्त केलीय.

ओबीसींच्या उपोषणाकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याची टीका करण्यात आल्यानंतर शासन स्तरावरून वेगाने हालचाली झाल्या आणि मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेलं. यानंतर सरकार ओबीसींशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात आलंय.

मात्र एकीकडे सगे सोयरे जीआर काढण्यासाठी सरकारन मनोज जरांगे पाटलांना 1 महिन्याचं आश्वासन दिलंय. तर दुसरीकडे ओबीसी आंदोलकांशी चर्चा करून त्यांनाही चुचकारण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. त्यामुळे यावर सरकार कसा तोडगा काढणार याचीच उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई आघाडीवर

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

SCROLL FOR NEXT