Ladki Bahin  saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार? 9000 रुपये वसूल करणार?

Ladki Bahin Yojana Viral Message : सोशल मीडियावर लाडकी योजनेसंदर्भात एक मेसेज व्हायरल होत आहे, त्यात लाडक बहिणींकडून पैसे परत घेतलं जातील असा दावा करण्यात आलाय. नेमका हा मेसेज काय आहे ते जाणून घेऊ.

Sandeep Chavan

आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची.अपात्र लाडकी बहिणींकडून सरकार 9 हजार रुपये वसूल करणार असा दावा करण्यात आलाय. खरंच सरकार परत पैसे घेणार का? लाडकींना निवडणुकीपूरतेच पैसे दिले का? याची आम्ही पडताळणी केली.त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

लाडक्या बहिणींना जुलैपासून महिन्याला 1500 रुपये मिळाले खरे मात्र, आता ज्यांनी पात्र नसतानाही अर्ज भरून पैसे घेतले त्यांच्याकडून आता पुन्हा परत पैसे घेणार असल्याचा दावा केला जातोय. यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. खरंच लाडकींना दिलेले पैसे सरकार परत घेणार का? असे अनेक प्रश्न लाडकींना पडलेयत. मात्र, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली .त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

खोटी माहिती देऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून या योजनेंतर्गत मिळालेला संपूर्ण लाभ परत घेतला जाईल. परत घेतलेले पैसे लोकोपयोगी, लोककल्याणकारी कामांसाठी, योजनांसाठी वापरले जातील.

हाच तो मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. त्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे...कारण, अपात्र कोण आणि पात्र कोण? हे अनेकांना माहिती नाही. त्यामुळे आपल्याकडून पैसे परत घेणार का? आता पैसे वापरून झाले मग आता कुठून आणून द्यायचे? असे सवाल उपस्थित होतायत.

राज्यात लाडकी बहीण योजनेचे एकूण लाभार्थी 2 कोटी 34 लाख आहेत. म्हणूनच याची सत्य माहिती सांगणं गरजेचं आहे.ग्रामीण भागातील महिलांनाही याची उत्सुकता असल्याने आमच्या व्हायरल सत्य टीमने याचं सत्य शोधण्यासाठी थेट मंत्री आदिती तटकरेंनाच याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी काय माहिती दिली ऐका. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य /साम इन्व्हिस्टिगेशन

लाडकींना आतापर्यंत 9 हजार रुपये देण्यात आले

अपात्र लाडकींना दिलेले पैसे परत घेतले जाणार नाही

अपात्र लाडकींचा अर्ज बाद केला जाणार

आता फक्त पात्र महिलांनाच पैसे मिळणार

त्यामुळे नियमाबाहेर कुणी अर्ज केले असतील त्यांना आता पैसे मिळणार नाहीत...मात्र, दिलेले 9 हजार रुपये सरकार परत घेणार नाही. त्यामुळे अपात्र लाडकींकडून पैसे परत घेणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

Dandruff Home Remedy : केस धुवण्यापूर्वी करा 'हे' काम, टाळूला येणार नाही खाज अन् कोंडाही होईल गायब

Maharashtra Live News Update : जय पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर

Solapur Anjangaon: अंजनगावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद अखेर मिटला; बैठकीत काय ठरलं?

Dhurandhar 2 Collection: गुड फ्रायडेला 'धुरंधर 2'ने केलं बंपर कलेक्शन; आदित्य धरच्या चित्रपटाची 1500 कोटीच्या क्लबमध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT