Government Office Photo Rules: Pm, Ministers And Historical Leaders Photo Guidelines saam tv
महाराष्ट्र

शासकीय कार्यालयात मंत्र्यांचा, पंतप्रधानांचा फोटो लावता येतो का? काय आहेत नियम?

PM, Ministers And Historical Icons Photo Rules: शासकीय कार्यालयात पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांचे फोटो लावता येतात का? महापुरुषांचे फोटो लावण्याबाबतचे नियम आणि निवडणूक आचारसंहितेतील तरतुदी काय आहेत ते जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • शासकीय कार्यालयात पंतप्रधानांचा फोटो लावता येतो का?

  • सरकारी कार्यालयात मंत्र्यांचा फोटो लावण्याचे नियम काय आहेत?

  • शासकीय कार्यालयात राजकीय नेत्यांचे फोटो लावण्यास परवानगी आहे का?

पराग ढोबळे साम प्रतिनिधी

सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील मुख्याध्यापकांच्या कार्यालयात महापुरुषांच्या फोटोसोबत पंतप्रधान मोदींचा फोटो लावल्यानं पुण्यात वाद निर्माण झालाय. नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मुख्याध्यपकांच्या कार्यालयात पंतप्रधान मोदींचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशेजारी होता. ही बाब एका विद्यार्थ्याने अमित ठाकरेंच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशाला, असं विचारत अमित ठाकरेंनी फोटो काढायला लावला.

सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील मुख्याध्यापकांच्या कार्यालयात महापुरुषांच्या फोटोसोबत पंतप्रधान मोदींचा फोटो लावल्यानं पुण्यात वाद निर्माण झालाय. नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेले होते.

त्यावेळी मुख्याध्यपकांच्या कार्यालयात पंतप्रधान मोदींचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशेजारी होता. ही बाब एका विद्यार्थ्याने अमित ठाकरेंच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशाला, असं विचारत अमित ठाकरेंनी फोटो काढायला लावला.

पण शासकीय कार्यालयात नेत्यांचे आणि महापुरुषांच्या फोटो लावण्याचे निमय काय आहेत हे माहिती आहेत का? शासकीय कार्यालयात मंत्र्यांचे किंवा राजकीय नेत्यांचे फोटो लावणे योग्य आहे अयोग्य? याचे शासकीय नियम काय हे सेवानिवृत्त जिल्हाधिकारी ई, झेड खोब्रागडे यांच्याकडून जाणून घेऊ.

शासकीय कार्यालयामध्ये मंत्र्यांचे फोटो लावणे योग्य आहे का?

नवीन पंतप्रधान येतात, राष्ट्रपती येतात तेव्हा त्यांचे फोटो लावण्याबाबत केंद्र किंवा राज्य शासन फोटोबाबत अधिकृत आदेश देत असते. ते पदावर असेपर्यंत त्यांचे फोटो लावणं हे बंधनकारक असतं. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो लावण्याबाबत शासन आदेश असतात.

परंतु फोटो कार्यालयात कुठे लावावेत हे त्या संस्थेतील प्रमुख आहेत. किंवा आस्थपनेच्या व्यवस्थापकांनी ठरवावे. मात्र पंतप्रधान, राष्ट्रपतींचे फोटो कुठेही लावणेही योग्य नाहीये, असे ई. झेड खोब्रागडे, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी म्हणालेत. तसेच काही कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात मंत्र्यांचे आणि देवी-देवतांचे फोटो आहेत तेही काढून टाकले पाहिजेत,असे ई. झेड खोब्रागडे म्हणालेत.

महापुरुषांच्या फोटोसोबत पंतप्रधान मोदींचा फोटो लावण्याने हा वाद निर्माण झालाय. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं त्याबाबत नव्याने नियम तयार करावीत. ज्यामुळे पुन्हा नव्याने वाद होऊ नयेत. शासकीय कार्यालयात मंत्र्यांचे फोटो लावणं चुकीचे आहे. कार्यालयात फक्त पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचा फोटो लावण्याचे आदेश आहेत. महापुरुषांचे फोटोबाबतही आदेश आहेत. त्यांचेही फोटो कार्यालयात लावले जातात. मात्र पंतप्रधानांचा फोटो महापुरुषांच्या फोटोच्या रांगेत न लावता दुसरीकडे लावावे. जेथे योग्य जागा असेल तेथे फोटो लावावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT