KRISHNA RIVER DEATH: JUNIOR ENGINEER ASHOK WADARE FOUND DEAD, Saam Tv
महाराष्ट्र

कृष्णा नदीत आढळला बांधकाम विभागाच्या अभियंत्याचा मृतदेह; नातेवाइकांना संशय, आमदाराच्या पीएसह अनेकांची नावं घेतली

Government Officer Found Dead in Krishna River at Jat: सांगलीमधील जत येथील कनिष्ठ अभियंत्याचा मृतदेह कृष्णा नदीपात्रात आढळून आला. त्रासाला कंटाळून आत्महत्या नव्हे; तर घातपात केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

Omkar Sonawane

सांगली जिल्ह्यातील जत येथील कृष्णा नदीत कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा मृतदेह आढळला.

नातेवाइकांचा संशय आहे की ही आत्महत्या नाही, तर घातपात आहे.

वडार यांना आमदार सहाय्यक आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांकडून सहा महिन्यांपासून त्रास दिला जात होता.

पोलिस तपास सुरू असून, नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही.

विजय पाटील, साम टीव्ही

सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्याचा मृतदेह आढळला आणि जिल्ह्यात खळबळ उडाली. अवधूत अशोक वडार असं या सरकारी अधिकाऱ्याचं नाव होतं. जत पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागात ते कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. ही आत्महत्या नव्हे, तर घातपात आहे, असा संशय नातेवाइकांना आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाइकांनी घेतला आहे

कनिष्ठ अभियंता अवधूत वडार हे जतच्या बांधकाम उपविभागात कार्यरत होते. सांगलीच्या कृष्णा नदीत आज, शनिवारी त्यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिकदृष्ट्या ही आत्महत्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी, नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. वडार यांना आमदाराचा स्वीय सहायक आणि जिल्हा परिषदच्या माजी सदस्याचा पती आणि पंचायत समिती कर्मचाऱ्यांकडून वारंवार त्रास दिला जात होता, असा खळबळजनक आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे.

कृष्णा नदीत तरंगताना दिसला मृतदेह

कृष्णा नदीच्या नवीन पुलाखाली मृतदेह तरंगताना काहींना दिसून आला. ही माहिती मिळाल्यानंतर सांगली शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी विशेष बचाव पथकाच्या मदतीनं मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. नंतर सांगलीच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आला. तपास केला असता मृत व्यक्ती जत पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होता, अशी माहिती मिळाली. वडार हे मूळचे इस्लामपूरचे होते. या घटनेची नोंद करून पुढील तपास सांगली शहर पोलीस करत आहेत.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

अभियंता वडार यांना एका आमदाराचे स्वीय सहायक, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचा पती, पंचायत समितीच्या काही कर्मचाऱ्यांकडून मागील सहा महिन्यांपासून त्रास दिला जात होता, असा गंभीर आरोप नातेवाइकांनी केला. ही आत्महत्या नाही, तर घातपात आहे. जोपर्यंत संबंधित दोषींवर कारवाई होत नाही; तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असं नातेवाइकांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM मोदींसह आईचा AI व्हिडिओ पोस्ट केला, आता पोलिसांची मोठी कारवाई; काँग्रेससह आयटी सेलवर गुन्हा

India Vs Pakistan: भारत-पाकिस्तान सामना रद्द होऊ शकतो का? BCCI ला अधिकार आहे का, काय आहे नियम? जाणून घ्या!

Sharad Pawar : वाटेल ती किंमत मोजू, पण...; सामाजिक ऐक्यावर शरद पवारांचं नाशकात महत्वाचं विधान

Maharashtra Politics: फडणवीस-शिंदे यांच्यात शीतयुद्ध पेटणार?

India Pakistan Cricket Match: खेळ मांडला.. ! भारत-पाकिस्तान सामन्याआधीच भाजप सरकार-ठाकरेंमध्ये 'सामना'

SCROLL FOR NEXT