सरकारकडून मानधन न मिळाल्याने राज्यातील 42 हजार होमगार्ड वाऱ्यावर Saam Tv
महाराष्ट्र

सरकारकडून मानधन न मिळाल्याने राज्यातील 42 हजार होमगार्ड वाऱ्यावर

गेल्या जवळपास दीड वर्षांत देशात कोरोना विषाणूने चांगलेच थैमान घातले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : गेल्या जवळपास दीड वर्षांत देशात कोरोना Corona विषाणूने चांगलेच थैमान घातले आहे. कोरोना विषाणूला आटोक्यात आणण्याकरिता वेळोवेळी लॉकडाऊनची Lockdown अमलबजावणी करण्यात आली आहे. शहरात कडक बंदोबस्तासाठी पोलिसांबरोबरच Police होमगार्ड्स Homeguard हे देखील दिवसरात्र राबावे लागले आहे. असे असताना गेल्या च४ महिन्यांपासून संबंधित होमगार्ड्सना त्यांच्या हक्काचे मानधन आजून देखील देण्यात आले नाही.

राज्यामधील तब्बल ४२ हजार होमगार्ड्सचे मानधन राज्य सरकारने State Government थकवले आहे. यामुळे अनेक होमगार्ड्सवर उपासमारीची देखील वेळ आली आहे. एप्रिल महिन्यापासून जुलैपर्यंत अशा एकूण ४ महिन्यांचे मानधन थकले आहे. विशेष म्हणजे महासमादेशक कार्यालयाकडून होमगार्ड्सना मानधन देण्याकरिता निधीच शिल्लक नाही. यामुळे राज्यामधील ४२ हजाराहून अधिक होमगार्ड्सचा पोटा- पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे देखील पहा-

मानधन न मिळूने, हे जवान विविध सण, उत्सव, निवडणुका आणि राजकीय सभा यासारख्या कार्यक्रमामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता दिवस रात्र झटत आहेत. पण त्यांना त्यांच्या कामाचे पैसे देखील मिळत नाहीत. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. खरेतर, २ वर्षांपूर्वी होमगार्ड्सच्या मानधनात वाढ करण्यात आली होती. २ वर्षांअगोदर त्यांना एका दिवसासाठी ३०० रुपये मिळत होते.

पण आता त्यांना एका दिवसासाठी ६७० रुपये दिले जात आहेत. प्रशासनाकडून होमगार्ड्सचे मानधन वाढवले खरे पण त्यांना देण्यासाठी लागणाऱ्या पैशांची तरतूद वार्षिक अंदाजपत्रकात करण्यात आली नाही. यामुळे सध्या महासमादेशक कार्यालयाकडे निधीचा तुटवडा जाणवला आहे. मागील वर्षी लॉकडाऊनच्या सुरुवातीला होमगार्ड्सचे मानधन थकवण्यात आले होते.

यामुळे होमगार्ड्स आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या प्रमाणात होरपळ झाली होती. ४ महिन्यांअगोदर सरकारने महासमादेशक विभागाला ५५ कोटी देऊन २ महिन्यांचे मानधन देण्यात आले होते. संबंधित होमगार्डनी थकीत मानधनाची पर्वा न करता कोरोनाच्या काळात सुरक्षारक्षकाची भूमिका जबाबदारीने पार पाडली आहे. मात्र, राज्य सरकारच्या दुर्लक्षाने त्यांच्यावर उपासमारीची आता वेळ आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs WI: 347 दिवसांनंतर 'या' गेमचेंजर खेळाडूची अखेर टीममध्ये एन्ट्री; पाहा वेस्ट इंडिजविरूद्ध कशी आहे प्लेईंग 11

Satara Tourism : साताऱ्याला गेल्यावर करा ट्रेकिंगचा प्लान, दिवसभर होईल धमाल-मस्ती

Jio Recharge Plan: सप्टेंबर २०२६ पर्यंत रिचार्जची चिंता मिटली! एकदाच रिचार्ज करा, संपूर्ण वर्षभर मोबाईल वापरा

Alia Bhatt : फोटोसाठी आलियाला ओढलं, हाताला झटका दिला; संतापजनक VIDEO समोर

Amravati Election : अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीला सुरुवात, २०२० मधील 'व्होट चोरी'चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

SCROLL FOR NEXT