Good news for government staff: August salary to be credited 5 days before Ganesh festival saam tv
महाराष्ट्र

Government Employees: खुशखबर! नोकरदांराना 5 दिवस आधीच पगार मिळणार

Maharashtra Government Decision: सरकारी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचे वेतन 26 ऑगस्ट रोजीच देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.

Bharat Jadhav

राज्यातील शासकिय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांना गणराया पावलाय. कारण सरकारी नोकरदारांच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवस आधीच येणार आहे. . गणेशोत्सव सणाचा उत्साह आणि गणेशोत्सवाची धूम लक्षात घेत सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय. राज्य सरकारकडून शासन निर्णय काढून 1 सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकार्यांचे वेतन 26 ऑगस्ट रोजी देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.

जिल्ह परिषद, मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषि विद्यापीठे/ कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत वेतनधारकांन / कुटुंब निवृत वेतनधारकांनाही हा निर्णय लागू राहणार आहे. यासर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाला तब्बल ५ दिवस आधीच आपला पगार मिळणार आहे.

शासन निर्णय -

शासन निर्णयातील परिच्छेद १ (८) मध्ये करण्यात आलेल्या तरतूद शिथील करुन, दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी देय होणाऱ्या माहे ऑगस्ट, २०२५ या महिन्याच्या वेतनाचे आणि निवृत्तीवेतनाचे / कुटुंब निवृत्तीवेतनाचे प्रदान दि. २६ ऑगस्ट, २०२५ रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे. या साठी मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्रमांक ७१ च्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ च्या खंड १ मधील नियम क्रमांक ३२८ मधील तरतुदी देखील तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात येत आहेत.

वेतन देयकांचे आणि निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन देयकांचे प्रदान दि. २६ ऑगस्ट, २०२५ या विहित दिनांकास होण्यासाठी सर्व संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी परिपूर्ण वेतन / निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन देयके यथास्थिती संबंधित उप कोषागार कार्यालय /जिल्हा कोषागार कार्यालय / अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई येथे त्वरीत सादर करण्याची दक्षता घ्यावी. सदर तरतूदी जिल्हा परिषद, मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषि विद्यापीठे / कृषि विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी / कर्मचारी, तसेच निवृतवेतनधारक / कुटुंब निवृतवेतनधारक यांना देखील लागू होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मासेप्रेमी खवय्यांनो सावधान! पापलेट तुमच्या ताटात दिसणार नाही? पापलेट मासा नामशेष होण्याच्या मार्गावर?

Navaratri 2025: नवरात्रीमध्ये 'या' मंत्रांचा करा जप, प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

Kolhapur Politics: हसन मुश्रीफांनी डाव पलटला; शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या नेत्याला राष्ट्रवादीत आणलं!

Beed Flood : बीडमध्ये पावसाचा धुमाकूळ; कुर्ला गावात 75 नागरिक पुरात अडकले, एनडीआरएफचे जवान मदतीला

Fact Check : अमित शाहांनी मागितला नरेंद्र मोदींचा राजीनामा? ऑपरेशन सिंदूरदरम्यान मोठी चूक झाली? Video

SCROLL FOR NEXT