बैलगाडा शर्यतीवरून राजकारण सुरू Saam tv news
महाराष्ट्र

बैलगाडा शर्यतीवरून राजकारण सुरू

गोवंश टिकला तर शेती-माती आणि गाव -माणसांच्या गोष्टी टिकतील. आपली संस्कृती टिकेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात गेल्या काही दिवसांपासून बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यांवरुन मोठा वादंग सुरु असल्याचे दिसत आहे. बैलगाडा शर्यतीला सरकारने बंदी घातलेली असताना राज्य सरकारच्याविरोधात भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. येत्या 20 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात पडळकरांनी बैलगाडा शर्यत होणार आहे. याबाबात त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन बैलगाडा शर्यतीची घोषणाही केली आहे. मात्र यावरुन राज्यात राजकारण पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Gopichand Padalkar has organized a bullock cart race on August 20)

''गोवंश टिकला तर शेती-माती आणि गाव -माणसांच्या गोष्टी टिकतील. आपली संस्कृती टिकेल. देशी दुभते-दुधाळ जनावरं पाहायचे असतील, येणाऱ्या पिढ्यांना सकस आहार द्यायचा असेल, बैलपोळा साजरा करायचा असेल, तर गोवंश टिकवावा लागेल. गोवंश वाढवावा लागेल. यासाठी आपल्या ग्रामीण व्यवस्थेत एक आधीपासूनच व्यवस्था आहे. ती म्हणजे बैलगाडा शर्यतीची.'' असे ट्विट भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

''बैलगाडा शर्यतीमुळं शेतकरी सकस बैलाचं पोषण करतो, त्याला सांभाळतो. त्यामुळेच तर आपल्या भागात खिलार सारखा गोवंश वाढला. पण बैलगाडा शर्यतीवर बंदी आणून आपल्याला हा गोवंशच नामशेष करायचाय काय? तामिळनाडू सारखा अध्यादेश महाराष्ट्र सरकारला काढता येत नाही का? शेतकऱ्यांनो आता आपल्यालाच आपल्या सर्जा-राजा,शेतीमाती साठी एकत्र यावं लागणार आहे. त्यामुळेच मी. भव्य बैलगाडा-छकडा शर्यतीचे दि. २० ॲागस्ट रोजी आयोजन केले आहे. तुमचं माझ्या गावी झरे, ता.आटपाडी, जि. सांगली येथे स्वागत आहे. या गोवंशाच्या आस्तित्वासाठी आणि शेतकरी आस्मितेसाठी. आपल्याला लढा द्यायचायं.'' असही त्यांनी म्हंटल आहे. त्याचबरोबर त्यांनी #शर्यत.असेही त्यांनी लिहीले आहे.

राज्यात बैलगाडा शर्यत बंदीचा कायदा लागू असतानाही पडळकर यांनी शर्यतीचे आयोजन केले आहे. 20 ऑगस्ट रोजी बैलगाडा शर्यत भरलीच तर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT