जाईल तिथं राजकारणाची खोड असलेले 'पोस्टर बॉय' इथेही खोडा घालतायेत- गोपीचंद पडळकर twitter/@GopichandP_MLC
महाराष्ट्र

जाईल तिथं राजकारणाची खोड असलेले 'पोस्टर बॉय' इथेही खोडा घालतायेत- गोपीचंद पडळकर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 'अश्वारूढ' पुतळा बसवावा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 'अश्वारूढ'च पुतळा बसवावा अशी मागणी विधानपरिषदेचे सदस्य आमदार गोपिचंद पडळकर यांनी केली आहे. सोबतच 'जाईल तिथं राजकारण' करण्याची खोड असलेले 'पोस्टर बॉय' इथेही खोडा घालतायेत अशी टीकाही त्यांनी स्मारक समितीवर केली आहे. (MLA Gopichand Padalkar has demanded that a 'equestrian' statue of Punyashlok Ahilya Devi Holkar be erected at Solapur University.)

हे देखील पहा -

आपल्या ट्विटरवरुन शेयर केलेल्या व्हिडिओत पडळकर म्हणाले की, ''आधीच्या स्मारक समितीने अश्वारूढ पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला होता. सर्वांनी मान्यताही दिली होती. पण 'जाईल तिथं राजकारण' करण्याची खोड असलेले 'पोस्टर बॉय' इथेही खोडा घालतायेत. परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं पवित्र नाव लाभलेल्या विद्यापीठाला आपण राज्याचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती म्हणून कुणाच्याच राजकारणाचा अड्डा होऊ देऊ नका, ही आपणास विनंती आहे. माँसाहेबांचा भव्य अश्वारूढच पुतळा उभारण्यात यावा अशा सुचना आपण विद्यापीठ प्रशासनाला द्याव्यात.'' असे वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. ते सांगलीच्या झरेत बोलत होते.

पहा व्हिडिओ -

परकीय आक्रमणाने  छिन्नविछीन्न झालेल्या हिंदू संस्कृतीचा व मंदीरांचा जीर्णोद्धार माँसाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला. त्यामुळेच माँसाहेबांच्या कर्तृत्वाला 'पुण्यश्लोक' संबोधलं गेलं. माँसाहेबांची शिवपिंड धारी केलेली प्रतिमा आजही जनमानसात रूजलेली आहे. पण त्याच बरोबर माँसाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक कुशल प्रशासक, एक मुत्सद्दी राजकारणी आणि महापराक्रमी महाराणी होत्या. त्यामुळे त्यांच्या महान कर्तृत्वाला साजेसा पुतळाही त्याच ताकदीचा असला पाहिजे.

त्यासाठी सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ आवारात उभारला जाणारा प्रस्तावित पुतळाही 'अश्वारूढ'च असला पाहिजे. अशी सर्वसामान्य जनतेची आग्रही भावना आहे असं पडळकर म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goa Tourism : गोव्यात लपलाय पांढराशुभ्र धबधबा, सौंदर्य पाहाल तर हरवून जाल

Maharashtra Live News Update: हिंगोलीत मुसळधार पाऊस, इसापूरमध्ये गावकरी अडकले

बीडचा उद्योजक तरूण गर्लफ्रेंडला भेटायला सोलापुरात गेला, कारमध्ये आढळला मृतदेह; पोलिसांना वेगळाच संशय

Karishma Kapoor Children: संजय कपूरच्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे; करिश्मा कपूरच्या मुलांची हायकोर्टात धाव, नेमका वाद काय?

Maharashtra Tourism: नैसेर्गिक सौंदर्य अन् मनमोहक दृश्ये; मालेगावपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक सुंदर ठिकाण, एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT