"महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरेच वाघ होते, तुमच्या सारख्या हुजऱ्यांना शेपटाचीही उपमा देता येणार नाही" SaamTV
महाराष्ट्र

"महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरेच वाघ होते, तुमच्या सारख्या हुजऱ्यांना शेपटाचीही उपमा देता येणार नाही"

'मविआ' सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राला लुटण्याची एकही संधी सोडत नाही.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : माझा महाराष्ट्र खरोखर सोन्यासारखा आहे. तुमचे महाविकास आघाडीचे सरकार MVA Goverment दगाफटक्याने सत्तेत आले आहे आणि ते सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राला लुटण्याची एकही संधी सोडत नसल्याची घणाघाती टीका भाजपा आमदार गोपिचंद पडळकर BJP MLA Gopichand Padalkar यांनी महाविकास आघाडी सरकारवरती केली आहे. तसेच महाराष्ट्रात एकच वाघ होते. ते म्हणजे हिंदुंचे हिंदुह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray तुमच्या सारख्या हुजऱ्यांना वाघाच्या शेपटाचीही उपमा देता येणार नाही अशी टीका त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवरती केली आहे. ते आज सांगलीमधील झरे येथे बोलत होते. (Gopichand Padalkar criticizes MVA government)

हे देखील पहा -

मागील दोन वर्षाती कोकणाला वादळाने दोन वेळा फटका दिला. शेतकऱ्यांची पीक दुष्काळात तर कधी ओल्या दुष्काळामुळे माती मोल झाली. स्वप्नील लोणकर Swapnil Lonakar सारखा होतकरू मुलगा आत्महत्या करतो. महाराष्ट्रात लालपरीची सेवा देणाऱ्या तब्बल २८ कर्मचाऱ्यांना पगाराअभावी आत्महत्या करावी लागत आहे. तर अनेक बारा बलुतेदारांवर, भटक्यांवर आर्थिक चणचणीमुळे आत्महत्या करण्याची वेळे येत असताना तुम्ही फक्त मदतीचे कागदी घोडे नाचवता आहात आणि मुळात खरी मदत कधी पोहचतच नाही असा आरोपही पडळकर यांनी सरकार वरती केला आहे.

सामान्यांच्या निर्णयासाठी तुमच्या तिघाडीत बिघाडी असते. पण बदलीतून मिळणाऱ्या मलीद्यासाठी तुमच्या एक वाच्यता असते. म्हणूनच तुमच्यासाठी रोजच दिवाळी आणि दसरा आहे. जनाब राऊत मेंढ्या ह्या शेतकऱ्यांसाठी जीविकेचे साधन आहे. ते दुधही देते आणि ऊबही देते. हे तुम्हा वसुलीवाल्यांना समजणार नाही असही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lymph Node Health Problems: शरीराच्या 'या' 4 भागांमध्ये गाठ दिसल्यास असू शकतो गंभीर कॅन्सर; कसं कराल निदान?

Delhi Blast: 'इस्लाम में सुसाइड हराम पर बॉम्बिंग...', दिल्ली स्फोटापूर्वीचा दहशतवादी उमरचा VIDEO समोर

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला गळती, २ बड्या नेत्यांची भाजपमध्ये एन्ट्री

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्याचे मामेभाऊ अल्हाद कलोती नगरसेवक पदासाठी रिंगणात...

Famous Singer Death: प्रसिद्ध गायकाचे ३४ व्या वर्षी निधन; मृत्यूशी झुंज ठरली अपयशी, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT