Gopichand Padalkar News: आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आमदार-तसेच खासदार आपआपल्या मतदारसंघात फिरून आढावा घेत आहेत. शिंदे गटाकडूनही निवडणुकीसाठी रणनिती आखली जात आहे. अशातच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक मोठी घोषणा केली आहे. (Latest Marathi News)
खानापूर विटा मतदारसंघातून आगामी 2024 विधानसभा निवडणूक लढणार, असं गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार अनिल बाबर यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. कारण, अनिल बाबर हे खानापूर विटा मतदारांचे विद्यमान आमदार आहेत.
राज्यात शिंदे-भाजप युतीचं सरकार असताना गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शिंदे गटातील आमदाराच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहे. अनिल बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर आमदार असून आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
तर महायुतीतील असणारे भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर आमदार आहेत. मात्र, पडळकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवला आहे.
2024 ची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायचा निर्धार आमदार पडळकर यांनी खानापूरच्या तामखडे येथे एका रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी केला आहे. तसेच कार्यकर्त्यांना त्या दृष्टीने कामाला लागायचे सूचना देखील यावेळी आमदार पडळकर यांनी केल्या आहेत.
पडळकरांच्या या घोषणेमुळे शिंदे गट शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मी गेल्या तीन वर्षात केलेली कामे आजी-माजी आमदारांच्यापेक्षा जास्त आहेत. १९९० पासून त्यांनी नुसते राजकारणच केले आहे. त्यांच्यासारखे टगेगिरीचे राजकारण आम्ही कधीच केले नाही. असंही गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.