crime News
crime News Saam TV
महाराष्ट्र

पार्सल द्यायला उशीर झाल्यानं गावगुंडांचा चायनीज विक्रेत्यावर हल्ला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उल्हासनगरात - गावगुंडांनी चायनीज विक्रेत्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पार्सल द्यायला उशीर झाल्यानं गावगुंडांनी चायनीज विक्रेत्यासह त्याच्या जावयावर जीवघेणा हल्ला चढवला. विठ्ठलवाडी पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतील व्हीनस चौकात घडलेल्या या घटनेमुळं उल्हासनगरात (Ulhasnagar) कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचं पाहायला मिळतं आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत व्हीनस चौक परिसर येतो. या चौकात दर्शन राय यांचं मनोज कोळीवाडा हे चायनीजचं दुकान आहे. या दुकानात 12 जूनच्या रात्री सव्वाबारा वाजता ज्ञानेश्वर भोईर हा पार्सल घेण्यासाठी आला. मात्र तोवर दुकान बंद झालेलं असल्यानं राय यांनी त्याला १० मिनिटं थांबायला सांगितलं. मात्र १० मिनिटात पार्सल न मिळाल्यानं त्यानं दर्शन राय यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी दुकानातील कारागिरांनी त्याला प्रत्युत्तर देत हुसकावून लावलं. मात्र काही वेळाने ज्ञानेश्वर भोईर हा त्याच्यासोबत कुख्यात गुंड शैलेश भोईर याच्यासह सुशील भोईर, अशोक कोळी आणि अन्य ४-५ जणांना घेऊन आला आणि त्यांनी थेट दर्शन राय यांच्यावर हल्ला चढवला.

हे देखील पाहा -

त्यांच्या डोक्यात बियरची बाटली फोडत रॉडने मारहाण करण्यात आली. तसंच त्यांच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेला त्यांचा जावई रुपेश राय याच्याही डोक्यात बियरची बाटली फोडून सिलेंडर आणि रॉडने मारहाण करण्यात आली. या घटनेत रुपेश याच्या डोक्यात दुखापत होऊन त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले. हाणामारीची ही घटना दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाली. या घटनेनंतर कारागिरांनी या दोघांना उचलून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं.

या घटनेप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तीन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या तिघांनाही सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या उर्वरित साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली आहे.

व्हीनस चौक हा उल्हासनगर शहरातला अतिशय गजबजलेला चौक म्हणून ओळखला जातो. या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी वर्गात दहशत पसरली असून पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्था कायम राखण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Lok Sabha News | Supriya Sule आणि Sunetra Pawar यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नोटीस, कारण काय?

Manish Sisodia: मनीष सिसोदिया यांना मोठा दिलासा, दिल्ली हायकोर्टाने मान्य केली मागणी

Travis Head Runout: ट्रेविस हेड आऊट की नॉटआऊट? थर्ड अंपायरच्या निर्णयावरून संगकाराचा पारा चढला - video

Hemant Soren: हेमंत सोरेन यांना मोठा धक्का, हायकोर्टाने फेटाळली याचिका; फक्त 'या' गोष्टीला दिली परवानगी

Budh Gochar 2024: १० मे नंतर 'या' तीन राशींना होणार धनलाभ; बुध देव करणार करोडपती होण्याचा आशीर्वाद

SCROLL FOR NEXT